Video : रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या काळात सर्व अधिकारीच त्यांचे कार्यकर्ते; रामराजेंचा थेट घणाघात

या अधिकाऱ्यांनी असले काम सोडले तर सगळ थांबेल असा थेट वार ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरावर टीका केली आहे.

News Photo   2025 11 04T150327.360

News Photo 2025 11 04T150327.360

अनेक काळ आमच्या घरात सत्ता नव्हती. मात्र, आमच्या काळात सत्ता आल्याने लोकांच्या सहकार्याने आणि पक्षाच्या पाठिंब्याने तालुक्यातील जिल्ह्यातील पाण्याचे, रोजगाराचे कंपन्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटले. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आमच्या तालुक्यात रोज चार घरचे लोक पोलीस ठाण्यात असायचे. (Ramraje Nimbalkar)  कारण आमच्या तालुक्याची भांडणं, मारामाऱ्या आणि रोज राजकीय अशी ओळख होती. परंतु, आमच्या काळात असं काही घडलंच नाही. हे सगळं थांबलं असं म्हणत सध्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या काळात सरकारी अधिकारीच याचे कार्यकर्ते झालेत. या अधिकाऱ्यांनी असले काम सोडले तर सगळ थांबेल असा थेट वार ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरावर टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सोबतच रणजितसिंह यांच्यावर घालण्यात आलेल्या दुग्धाभिषेकावरूनही रामराजे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. रणजितसिंह यांनी फलटणच्या सामान्य लोकांना फार त्रास दिला आहे. त्यामुळे मी शेवटपर्यंत त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध करणार, असं म्हणत रामराजे यांनी दंड थोपटले आहेत. रणजितसिंह निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी रामराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत बोलताना रणजितसिंह निंबाळकर यांना जनाधार नाही. त्यांनी काल इकडून-तिकडून माणसं आणले होते. आजकाल माणसं आणण्याचं शास्त्र झालं आहे. काल त्यांचा तथाकथित इव्हेंट झाला. हा इव्हेंट दाखवला जात होता, तेव्हा त्याच्या खालच्या कमेंट वाचल्या तर लोकांचे मत काय आहे ते समजेल. त्यांचा इव्हेंट त्यांना लखलाभ, अशी बोचरी टीका रामराजे निंबाळकर यांनी केली.

 रामराजे निंबाळकरांकडे बोट दाखवत रणजितसिंह निंबाळकरांकडून थेट व्हिडीओ कॉल जाहीर

रणजितसिंह निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्या समर्थकांनी त्यांचा दुग्धाभिषेक केला. त्यावरही रामराजे निंबाळकर यांनी सडकून टीका केली. दूध कोणाला घालतात. माझ्या माहितीप्रमाणे दूध शंकराच्या पिंडीवर घालतात. दूध देवावर घालतात, असे म्हणत रणजितसिंह निंबाळकर देव आहेत का? असा सवाल रामराजे निंबाळकर यांनी केला. तसेच रणजितसिंह निंबाळकर हे जर स्वत:ला देव समजत असतील तर फलटण नगरपालिकेचं पाणी तरी वापरू नका, असा सल्लाही रामराजे यांनी दिला.

हा ग्रहस्थ म्हटलं तर नात्यातील आहे आणि म्हटलं तर नात्यातील नाही. कारण निंबाळकर घराण्याची ही संस्कृती नाही. खंडणी, प्रशासकीय दबाव याच्या मदतीने रणजितसिंह निंबाळकर यांनी कारस्थानं रचली. सर्वसामान्य लोकांना त्यांनी हैराण करून सोडलं आहे. याला मी शेवटपर्यंत विरोध करणार आहे, असे दंडच रामराजे निंबाळकर यांनी थोपटले आहेत. सोबतच यात त्यांच्या भाजपा पक्षाचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करत त्यांनी हा लढा फक्त रणजितसिंह निंबाळकर आणि माझ्यात असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version