Ramraje Nimbalkar देवेंद्र फडणवीसांचे उंबरे का झिजवत होते ?

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (77)

फलटण : फलटणमध्ये सध्या रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar ) आणि रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Nimbalkar ) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे, रणजित निंबाळकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, अनेक दिवस झाले रामराजे निबाळकर हे भाजपच्या वाटेवर आहेत, म्हणून ते सतत हेलपाटे मारत आहेत, मात्र देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नकार दिल्यानंतर २ दिवसापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) भेट घेतली असल्याचा रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली आहे.

बरेच दिवस झालं ते आम्हाला भाजपमध्ये घ्या, म्हणून हेलपाटे मारत आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट त्यांनी काल परवा घेतली आहे. त्यामुळे त्यांनी त्या सभेमधून घड्याळ चिन्ह आणि शरद पवारांचं लोगो गायब केला, असं अनेकवेळा केलं आहे, त्यांना वाटलं की मला भाजपमध्ये किंवा शिवसेनेत घेतील, म्हणून त्यांनी चिन्ह गायब केला असल्याचा त्यांनी गौप्यस्फोट केला.

तसेच मी ज्या वेगाने विकासकामे करत आहे, त्याचा आमदार रामराजे यांना जोराचा धक्का बसला आहे. त्यातून ते सावरावेत. यासाठी आपण नीरा-देवघर, रेल्वेसह अन्य सर्व आणलेल्या सर्व विकास कामांचे श्रेय रामराजे यांना देत आहे. मला जनतेच्या हिताची कामे करायची आहेत. त्यामुळे श्रेयवादात पडायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us