आनंदाच्या शिधेतून नागरिकांच्या आयुष्याशी खेळ, राष्ट्रवादीचे टीकास्त्र

आधी बुरशीजन्य डाळ, आता मेलेला उंदीर, गतिमान सरकारचा आनंदाचा शिधा नागरिकांच्या आय़ुष्याशी खेळ करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत सत्ताधारी सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. आधी बुरशीजन्य डाळ, आता मेलेला उंदीर… गतिमान सरकारचा आनंदाचा शिधा करतोय नागरिकांच्या आयुष्याशी खेळ आनंदाचा शिधा वाटपातून लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा […]

Ncp Aanandachi Shidha

Ncp Aanandachi Shidha

आधी बुरशीजन्य डाळ, आता मेलेला उंदीर, गतिमान सरकारचा आनंदाचा शिधा नागरिकांच्या आय़ुष्याशी खेळ करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत सत्ताधारी सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटलं, “आधी बुरशीजन्य डाळ, आता मेलेला उंदीर… गतिमान सरकारचा आनंदाचा शिधा करतोय नागरिकांच्या आयुष्याशी खेळ” असं टायटल देत आनंदाच्या शिधावरुन आता राज्य सरकारला घेरलं आहे.

‘त्या’ फोननंतर मिळाले महिला आयोगाचे अध्यक्षपद; चाकणकरांनी सांगितला खास किस्सा

तसेच आनंदाचा शिधा वाटपातून लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा सपाटा गतिमान सरकारने लावला आहे. काही दिवसांपूर्वीच बुरशीजन्य डाळीचे वाटप करून सरकारने गोरगरीब जनतेची थट्टा केली जात आहे.

सुप्रिया सुळेंचा मोठा दावा ! म्हणाल्या, 15 दिवसांत दोन राजकीय भूकंप एक दिल्लीत तर दुसरा…

भंडारा जिल्ह्यात डाळीमध्ये मेलेला उंदीर सापडला आहे. आनंदाचा शिधा वाटपातील हा हलगर्जीपणा वेळोवेळी उघड होत असून लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा शिधा वाटून नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड शिंदे-फडणवीस सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

दादा जिथे आम्ही तिथे…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांचा अजित पवारांना जाहीर पाठिंबा

मागील काही दिवसांपूर्वीच मोहाडी तालुक्यातील नेरीत 50 पेक्षा अधिक आनंदाच्या शिधांमध्ये बुरशीजन्य हरभरा डाळ असलेला शिधा लाभार्थांना मिळाला. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. असं असतानाच आता पुन्हा एकदा ‘आनंदाचा शिधा प्रकरण चर्चेत आलंय.

मोहाडीच्या डोंगरगावातील आनंदाचा शिधा मिळालेल्या एका लाभार्थ्याच्या आनंदाच्या शिधामधील हरभरा डाळीत चक्क मेलेला उंदीर आणि बुरशीजन्य डाळ प्राप्त झालीय. बुरशीजन्य डाळ परत घेण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. त्यानंतर आता यापुढेही अनेक शिधांमध्ये अशा घटना घडण्याची शक्यता अनेकांकडून वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version