Download App

मी तुला आतून बाहेरून ओळखतो…; स्वाभिमानीतून हकालपट्टी झाल्यानंतर तुपकरांचे टीकास्त्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यांनंतर रविकांत तुपकरांनी शेट्टींवर टीका केली. मी तुला आतून बाहेरू ओळखतो, असं ते म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Ravikant Tupkar on Raju Shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा (Swabhimani Shetkari sangathana) प्रमुख आक्रमक चेहरा आणि राजू शेट्टी (Raju Shetty) यांचे निकटवर्ती अशी ओळख असलेले रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यावर पक्ष संघटनेने मोठी कारवाई केली आहे. तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आता रविकांत तुपकरांनी नाव न घेता शेट्टींवर टीका केली. मी तुला आतून बाहेरू ओळखतो, अशी टीका तुपकरांनी केली.

Assembly Election: विधानसभेसाठी संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर एकत्र येणार ? 

 

राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अखेर या मतभेदांनी टोक गाठलं आहे. तुपकरांची आज पक्षातून हकालपट्टी आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या कारवाईनंतर रविकांत तुपकरांनी ट्विट एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, संक्रमण होणार याची खूण ओळखतो, पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो…. माहिती आहे मला पुढची तुझी खेळी, मी तुला आतून बाहेरून ओळखतो, असं रविकांत तुपकर म्हणाले. यासोबत त्यांनी सुरेश भट यांची विझलो जरी आज मी… या कवितेच्या ओळी पोस्ट केल्या.

विरोधकांवर खापर कसले फोडता? मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी फडणवीसच; पटोलेंचा हल्लाबोल 

जालिंदर पाटील काय म्हणाले?
जालिंदर पाटील म्हणाले की, तुपकर हे ३-४ वर्षांपासून संघटनेच्या एकाही आंदोलनाला आले नाहीत. उलटपक्ष त्यांनी स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर बेछुट आरोप केले. यामुळे यापुढे शेतकरी संघटना आणि तुपकर यांचा कोणताही संबंध नसल्याचे नाही. तुपकर यांची नुकतीच पुण्यात बैठक झाली. ही बैठक घेताना त्यांनी पक्षप्रमुख राजू शेट्टी यांना विश्वासात घेतले नाही. ही संघटना माझीच आहे, अशाप्रकारे ते वागत आहेत, आता शेतकरी संघटना आणि रवींद्र तुपकर यांच्यातील संबंध संपलेला आहे.

24 तारखेला घेणार पुढचा निर्णय…
दरम्यान, २२ वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जिवाचं रान केलं राजू शेट्टी आणि माझ्यात दुरावा का निर्माण झाला हे मला माहित नाही. आम्ही कांदा आणि धानासाठी आंदोलन केले हा आमचा दोष आहे का? असा सवाल करत राजू शेट्टी असा निर्णय घेतील, असे मला वाटले नव्हते. 24 तारखेला आम्ही बैठक बोलावली आहे, त्या बैठकीत पुढील निर्णय घेऊ, असं तुपकर यांनी म्हटलं.

follow us