विरोधकांवर खापर कसले फोडता? मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी फडणवीसच; पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole on Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं. सत्ताधारी आणि विरोधक आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) जोरदार प्रत्युत्तर केली. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीसच आहेत, अशी घणाघाती टीका पटोलेंनी केली.
अफवांवर विश्वास ठेवू नका; व्हिडीओ शअर करत राहत फतेह अली खानने अटकेच्या बातम्या फेटाळल्या
मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी फडणवीसच
नाना पटोलेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आरक्षणाच्या मुद्यावर बोलतांना त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुतीनेच पेटवला आहे. मराठा आरक्षण रखडण्याचे पापही भाजप आणि फडणवीसांचे आहे. 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते, मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षण अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर केले नाही. म्हणून ते आरक्षण गेले. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीसच आहेत, अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.
गर्भवतीसह दोन चिमुकल्यांनाही फेकलं नदीत; अनैतिक संबंधातून क्रुर प्रियकराकडून धक्कादायक प्रकार
विरोधी पक्षांवर खापर कसले फोडता ?
पुढं बोलताना पटोले म्हणाले, 2014 मध्ये फडणवीस यांनी सत्तेत आल्यास मराठा, धनगर, हलबा यासह विविध जाती-जमातींना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. आता ही आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार आणि फडणवीस यांची असताना विरोधी पक्षांवर खापर कसले फोडता ? असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
आरक्षण देण्यास सरकारकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे महायुतीचे नेते आणि मंत्री म्हणत आहेत. मात्र यआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा झाली. विरोधी पक्षांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची आहे, मात्र सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत. केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार असताना आरक्षण देण्यापासून महायुती सरकारला कोणी अडवले? तात्काळ निर्णय घेतला पाहिजे, असं पटोले म्हणाले.
अदानींना कोट्यवधी रुपयांची जमीन कवडीमोल देताना विरोधकांना विचारता का? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये हलवताना विरोधकांना विचारले का? आरक्षणाचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे, तो त्यांनी घ्यावा. यातून सरकारला हात झटकता येणार नाही, असंही पटोले म्हणाले.