गर्भवतीसह दोन चिमुकल्यांनाही फेकलं नदीत; अनैतिक संबंधातून क्रुर प्रियकराकडून धक्कादायक प्रकार

गर्भवतीसह दोन चिमुकल्यांनाही फेकलं नदीत; अनैतिक संबंधातून क्रुर प्रियकराकडून धक्कादायक प्रकार

Pregnant Lady and sons Thrown in the river by Lover in Pune Maval : अनैतिक संबंधांतून अनेक धक्कादायक प्रकार घडल्याचं आपण पाहतो. असाच धक्कादायक प्रकार पुण्यातील मावळमध्ये समोर आला आहे. या घटनेत क्रुर प्रियकराने गर्भवती (Pregnant Lady ) राहिलेल्या आपल्या विवाहित प्रेयसीसह तिच्या दोन मुलांना थेट नदीत फेकून (Thrown in the river) दिल्याने त्यांचा करून अंत झाला आहे. या घटनेमुळे सध्या परिसरात खळबळ उडाली आहे.

आता मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना येणार का?, चढ्ढाला 400 कोटी दिल्याने वडेट्टीवार संतप्त

नेमकं प्रकरण काय?

मावळ तालुक्यातील या मृत 25 वर्षीय महिलेसोबत गजेंद्र दगडखैर (वय 37 वर्ष) या व्यक्तीचे अनैतिक संबंध होते. यातून ही महिला गर्भवती राहिली होती. त्यामुळे तिचा गर्भपात करण्यासाठी गजेंद्रने तिला कळंबोली येथील रुग्णालयात नेलं होतं. मात्र यावेळी डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर गजेंद्र दगडखैर आणि रविकांत गायकवाड या दोघांनी या महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मावळमध्ये इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात फेकून दिला. यावेळी या महिलेची पाच वर्षे तसेच दोन वर्षे मुलं सोबत असल्याने ते दोघेही रडू लागली. त्यावेळी आपलं बिंग फुटू नये म्हणून या क्रुर प्रियकराने या महिलेच्या दोन्ही मुलांना जिवंत नदीत फेकून दिलं.

हिलीच्या पुस्तकातील कवितेत इंग्रजी शब्द; संतप्त युजर्सकडून बालभारती ट्रोल

दुसरीकडे या महिलेच्या कुटुंबीयांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांमध्ये महिला आणि तिचे दोन्ही मुलं हरवल्याची तक्रार दिली. त्यावेळी पोलिसांनी तपासचक्र फिरवली असता या महिलेचे अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं. त्यात पोलिसांचा गजेंद्र आणि रविकांत यांच्याशी संपर्क झाला. या दोघांचीही कसून चौकशी केली असता त्यांनी हा सर्व प्रकार कबूल केला. त्यानंतर आता तळेगाव पोलिसांनी या दोघांनाही पेढ्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube