पहिलीच्या पुस्तकातील कवितेत इंग्रजी शब्द; संतप्त युजर्सकडून बालभारती ट्रोल

पहिलीच्या पुस्तकातील कवितेत इंग्रजी शब्द; संतप्त युजर्सकडून बालभारती ट्रोल

Balbharati Book Use English Words Viral Post : इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या (Balbharati Book) पुस्तकातील एका कवितेमध्ये थेट इंग्रजी शब्दांचा उल्लेख करण्यात आला आहे. (Maharashtra ) या कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये (Viral Post ) वन्समोअर, वन्समोअर झाला शोर’ असं लिहिण्यात आलं आहे. किमान मराठी भाषा शिकवत असताना (Social media) मराठी शब्दाचा वापर व्हायला हवा असं मत काही जणांनी व्यक्त केलं आहे. मराठीच्या पहिल्या पुस्तकात ‘जंगलात ठरली मैफल’ अशी कविता आहे. या कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आल्याचे दिसत आहे.


महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्त निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत बालभारतीची पुस्तकं प्रकाशित करते. परंतु इयत्ता पहिलीच्या बालभारती पुस्तकात वापरलेल्या इंग्रजी शब्दामुळे हे पुस्तक जोरदार चर्चेत आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषा पुस्तकात मराठी शब्द का नाही? असा प्रश्न अनेकांनी केला आहे.

काय आहे पुस्तकातील कविता

जंगलात ठरली मैफल
‘जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल
अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल,
तबल्यावर होती कोल्होबाची साथ
वाघोबा म्हणाले, नाही ना बात ?
पेटी मी किती वाजवतो सुंदर
हसत हसत म्हणाले साळींदर.
गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस
संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस !
मुंगीने लावला वरचा सां
आवाज आवाज ओरडला ससा.
ठुमकत नाचत आला मोर
वन्समोअर, वन्समोअर झाला शोर !

Girish Oak Post: अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

संदीप जोशी यांनी पोस्ट केलेल्या फेसबूक पोस्टवरून यासंदर्भात चर्चा होत आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की, ‘हे आहे महाराष्ट्र शासनाचे बालभारतीचे इयत्ता पहिली चे पुस्तक. कवितेच्या ओळीमध्ये लिहिलं आहे वन्स मोर वन्स मोर झाला शोर.. किमान मराठी भाषा शिकवताना मराठी शब्द वापरायला हवेत असं वाटत नाही का? तुमचे मत काय?’ काय ते यमक, काय तो अद्भुत कल्पनाविलास! शाब्बास…. आणि आपण अपेक्षा करतोय नव्या पिढीकडून. त्यांना आधी आपण काय देतोय ते बघा. पूर्ण कविताच हास्यास्पद आहे. माऊस आणि शोर हे तरी काय मराठी शब्द आहेत काय.. याबद्दल बालभारती च्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन आपण तक्रार नोंदवू शकतो ज्याची दखल घेतली जाते. मी सुद्धा बालभारती च्या पाठ्य पुस्तक मंडळात लेखक म्हणून काम केले आहे त्यावरून सांगते. अशा कॉमेंट्स सध्या युजर करत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube