‘बालभारती’चे डोमेन नेम विकणे आहे! राज्याच्या शिक्षण विभागात खळबळ

‘बालभारती’चे डोमेन नेम विकणे आहे! राज्याच्या शिक्षण विभागात खळबळ

Balbharti ad : शालेय पाठ्यपुस्तके तयार करण्याचं काम करणारे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ (Maharashtra State Textbook Production Corporation) म्हणजे, ‘बालभारती’ची एक जाहिरात आज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या संस्थेच्या वेबसाईटचे ऑनलाइन नाव ‘BaalBharti.in’ हे डोमेन नेम विकणे आहे, अशी जाहिरात बालभारतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आणि अवघ्या काही वेळात शिक्षण विभाग अक्षरश: हादरला. दरम्यान, या घटनेनंतर बालभारतीने याबाबत खुलासा केला आहे. (domain name of Balbharti is for sale in only 2 thousand Excitement in the state education department)

बालभारती या राज्य सरकारच्या महत्त्वाच्या संस्थेचं balbharti.in हे डोमेन नाव दोन हजार अमेरिकन डॉलर्समध्ये विकण्याची जाहिरात प्रकशित झालाी. दरम्यान, या घटनेनंतर बालभारतीने अधिकृत खुलासा केला आहे. बालभारतीचे balbharati.im हे अधिकृत डोमेन असून ते २००५-०६ साली घेण्यात आले. तर डोमेनच्या नूतनीकरणाची पुढील पाच वर्षाची प्रक्रिया २०२३ मध्ये केली आहे. असे असतांनाही ही जाहिरात प्रसिध्द झाली. त्यामुळं काही सायबर हॅकरने बालभारतीचे डोमेन हॅक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आपण संबंधित तांत्रिक विभागाकडे रितसर तक्रार केल्याचेही बालभारतीने म्हटले आहे. तर बालभारतीची वेबसाईट व्यवस्थित काम करत असल्याचा दावाही बालभारतीने केलाआहे.

तर ‘बालभारती’चे अधिकृत डोमेन विकण्याची जाहिरात सध्या इंटरनेटवर दिसत असून ही एक प्रकारची फसवणूक आहे. याप्रकरणी बालभारतीकडून कार्यवाही करण्यात येत आहे. लवकरच कायदेशीर तक्रार दाखल केली जाईल. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे, असं राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितलं.

बालभारती काय काम करते?

‘बाल भारती’ ही संस्था शालेय पाठ्यपुस्तके तयार करते. छापते आणि त्यांची विक्री करते. बालभारती दरवर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू आणि सिंधी अशा ८ भाषांमध्ये ९३२ शीर्षकांसह ९ कोटी पुस्तके प्रकाशित करते. पुणे येथील मुख्य कार्यालयासह बालभारतीच्या 9 विभागीय गोदामांद्वारे पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते.

छपाईचे काम मुंबई कार्यालयातून केले जाते. बालभारतीचे स्वतःचे कोणतेही मुद्रणालय नाही. देशभरातील विविध प्रेसद्वारे पाठ्यपुस्तके छापली जातात. पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त मुलांचे आवडते मासिक ‘किशोर’ हे बालभारतीच प्रकाशित करते. एक अतिशय आकर्षक आणि सचित्र इंग्रजी-मराठी शब्दकोश, निवडक बालभारतीचे 14 खंड आणि इतर अनेक अतिरिक्त पुस्तके बालभारतीने प्रकाशित केली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube