Malaika Arora Pregnant: लग्नाच्या आधीच मलायका अरोरा प्रेग्नंट? यावर अर्जुन कपूर म्हणतो, ‘आम्ही कलाकार …’
Malaika Arora Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सतत काही ना काही कारणाने जोरदार चर्चेत येत असते. आता अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत रंगली आहे, अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) याबद्दल चांगलेच स्पष्टीकरण दिले आहे. मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) गेल्या काही दिवसांपासून रिलेशनमध्ये असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
त्या दोघांना अनेकवेळा ते एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. दोघांमध्ये वयाचं खूप अंतर आहे, यामुळे त्यांना सतत ट्रोल करण्यात येत आहेत. पण आता अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची चर्चा खूपच जोर धरत आहे. नेटकऱ्यांची शाळा घेत मलायकाच्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चांबद्दल अर्जुन कपूर म्हणाला की,”नकारात्मक, चुकीच्या, खोट्या बातम्या पसरवणे खूप होत आहे. या बातम्यामुळे कायम चर्चेत येता पण हे चुकीचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.
View this post on Instagram
आम्ही कलाकार आहोत. यामुळे आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय घडत आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण कृपया अफवा पसरवणं बंद करा. आम्हीपण साधारण माणसंच आहोत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या ६ वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनमध्ये आहेत. अर्जुन कपूरअगोदर मलायकाने भाईजानचा भाऊ अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं खूप काळ टिकलं नाही आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.
मलायका प्रेग्नंट असल्याची चर्चा याअगोदर देखील चांगलीच रंगली होती. त्यावेळी अर्जुनने एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, अशा खोट्या बातम्यांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. पण या बातम्या एवढ्या पसरतात की लोकांना त्या खऱ्या वाटायला लागतात. आम्हाला आमचं आयुष्य आमच्या पद्धतीने जगू द्या”. तसेच मलायका आता 49 वर्षांची आहे. तर अर्जन 37 वर्षांचा आहे. अर्जुन मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.
‘इश्कजादे’ या सिनेमातून अर्जुनने सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. त्याचे गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड हे सिनेमे चाहत्यांच्या मोठ्या पसंतीस उतरले आहेत. तर दुसरीकडे छैय्या छेय्या या गाण्यामुळे मलायका जोरदार चर्चेत आली होती. मलायका आणि अर्जुनच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता मोठी उत्सुकता लागली आहे.