Download App

Ravikant Tupkar : आठ दिवसांत मागण्या मान्य करा अन्यथा…; आंदोलन मागे घेत तुपकरांचा इशारा

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर ( Ravikant Tupkar ) यांचं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू होतं. या अगोदर देखईल त्यांनी बुलढाण्यात याच मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा देखील त्यांनी सरकारला या मागण्या मान्य न झाल्यास दिला होता. मात्र राज्य सरकारने यावर बैठक घेऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात येणार आलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा त्यांना हे आंदोलन केले आहे. यावेळी देखील त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. ( Swabhimani Shetakari Sanghtana Ravikant Tupkar stop Strike but gives ultimatum to government )

New Academic Year : राज्यात आजपासून शाळा सुरू; नव्या शैक्षणिक बदलांची विद्यार्थ्यांना उत्सुकता

रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची पीक विमा कंपनीने दखल घेतली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने देखील त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे त्यांनी हे आंदोलक मागे घेतले आहे. मात्र सर्व मागण्या येत्या आठ दिवसांत मान्य न झाल्यास पुन्हा असंच आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Defamation Case: वर्तमानपत्रातील ‘त्या’ जाहिरातीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधींना मानहानीची नोटीस

काय होत रविकांत तुपकरांचं आंदोलन?

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलन सुरू केलं होतं. यावेळी त्यांनी 15 जूनपर्यंत त्यांच्या मागण्या मान्या न झाल्यास 16 जूनला बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जच्या इमारतीवरून उड्या मारू असा इशारा राज्य सरकारला दिला होता. तर या शेतकऱ्यांचं काही बरं बाईट झालं तर त्याला सरकरल जबादार असेल असं देखील ते म्हणाले होते. त्यानंतर विमा कंपन्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करायला सुरूवात केली. तसेच सरकारने त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे त्यामुळे त्यांनी हे आंदोलक मागे घेतले आहे. मात्र सर्व मागण्या येत्या आठ दिवसांत मान्या न झाल्यास पुन्हा असंच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Tags

follow us