Defamation Case: वर्तमानपत्रातील ‘त्या’ जाहिरातीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधींना मानहानीची नोटीस
Defamation Case on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कर्नाटकमध्ये नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हेही सहआरोपी आहेत, त्यामुळे त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. बेंगळुरूच्या मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांविरोधात समन्स जारी केले आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने 9 मे रोजी ही तक्रार दाखल केली होती. तेव्हा काँग्रेस नेत्यांनी 40 टक्के भ्रष्टाचाराचे वक्तव्य केले होते. तक्रारीत असे म्हटले आहे की, 5 मे 2023 रोजी काँग्रेस पक्षाने वर्तमानपत्रात जाहिरात दिली. ज्यामध्ये भाजप सरकारमध्ये 40 टक्के भ्रष्टाचार असून गेल्या 4 वर्षात राज्यात 1.5 लाख कोटी रुपयांची लूट झाल्याचा दावा करण्यात आला होता. भाजपने हे आरोप निराधार असल्याचे सांगत मानहानीची तक्रार दाखल केली आहे.
Kolkata Airport Fire: कोलकाता विमानतळावर आगीची दुर्घटना टळली, प्रवाशांची धावपळ
या वर्षाच्या सुरुवातीला कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने 40 टक्के भ्रष्टाचाराचा मुद्दा जोरात मांडला होता. सरकारमधील 40 टक्के मंत्री आणि अधिकारी भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये 40 टक्के कमिशन घेतले जाते. काँग्रेसने यासाठी Paycm मोहीमही सुरू केली होती. त्यांचे नेते आणि मंत्री भ्रष्ट असल्याचा दावा भाजपने पूर्णपणे फेटाळून लावला. या आरोपांनंतरही भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले होते.
गुगलला 2 हजार 296 कोटींचा दंड, ‘हे’ आहेत कंपनीचे कारनामे
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसकडून सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर काँग्रेससाठी पहिली खुशखबर कर्नाटकातून आली आहे. सध्या तीन नेत्यांवर मानहानीचे दावे दाखल करण्यात आले आहेत.