Download App

Ravindra Dhangekar : ‘नरेंद्र मोदी पुण्यातून लढले तर त्यांचा पराभव करू’; धंगेकरांचं खुलं आव्हान…

Ravindra Dhangekar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच पुण्यात स्वागत आहे. ते पुण्यातून लोकसभा लढवतील, अशा बातम्या मी प्रसारमाध्यमातून पाहिल्या. मात्र, पक्षाने मला संधी दिली तर त्यांचा मी निश्चित पराभव करेल, असं थेट आव्हान पुण्यातील कसबा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांनी मोदींना दिलं आहे.

India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोला ‘खो’

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे 2024 ला पुण्यातून लोकसभा लढवतील अशा बातम्या माध्यमातून झळकल्यानंतर पुण्यातील भाजप नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाने जर असं ठरवलं असेल तर पंतप्रधान मोदी यांना आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आणू तसेच, या चर्चेमध्ये काही तथ्य नसलं तरीही आम्ही आता मोदींना पत्र लिहून पुण्यात लोकसभा लढवण्यासाठी आग्रह करणार असल्याचं म्हटलं, शिवाय मोदींना तत्काळ त्यांनी पत्र लिहिलं आहे.

Chandrayaan 3 Moonquake: चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या ‘विक्रम’ने लावला शोध; भूकंपासारख्या..,

यानंतर लगेच आमदार धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) यावर आपली प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींना आव्हान केलं आहे. ते म्हणाले, पुण्यात आम्ही पंतप्रधान मोदींच स्वागत करू मात्र, गेल्या नऊ वर्षाचा मोदी सरकारचा कारभार पाहिला तर देशातील जनता त्रस्त आहे. माझ्यासह देशातील जनता निवडणुकीची वाट पाहत आहे.

मुंबईत आज होत असलेल्या इंडिया’च्या बैठकीत ठरेल की पुण्याची लोकसभा कुणी लढवायची. मा विकासाकडे ने कुठलाही उमेदवार दिला तर आम्ही त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू. मात्र, मी गेल्या 30 वर्षापासून पुणे शहरात काम करत आहे. मला जर पक्षाने संधी दिली तर मी निश्चितपणे पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं म्हणत धंगेकरांनी मोदींना थेट आव्हानच केलं आहे.

मला वाटलं विखे भाजपात काम करतील की नाही… चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले?

दरम्यान, पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची चर्चा अनेकदा झाली, मात्र निवडणूक कार्यक्रम काही जाहीर झाला नाही. मात्र आता 2024 च्या लोकसभेला भाजपकडून येथून कोण लढणार याबाबतच्या चर्चा रंगत आहेत.

गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र आज तर चक्क पंतप्रधान मोदींच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने संपूर्ण देशाचं लक्ष पुणे लोकसभेकडे लागलं आहे. आता पुण्यातून भाजपकडून लोकसभा कोण लढवणार अन काँग्रेसकडून उमेदवार कोण असणार याचे उत्तर 2024 ला मिळेलच मात्र तूर्तास भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक जोरदार सुरू झाली आहे.

follow us

वेब स्टोरीज