Download App

Ram Satpute : मारकडवाडीच्या मतदानाआधी राम सातपुतेंचा धमाका; ऑडिओ क्लिपमध्ये काय?

राम सातपुते यांनी केलेल्या ट्विटमध्ये उत्तन जानकर यांचे कार्यकर्ते आबा सोपान मारकड आणि मारकडवाडी नागरिक यांच्यातील असल्याचं

  • Written By: Last Updated:

Re-voting in Markadwadi : निवडणुकीचा निकाल लागलाय. मात्र, अजूनही सरकार स्थापन झाले नाही. यंदाच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीमध्ये ग्रामस्थांनी पुन्हा एकदा मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राम सातपुते यांनी ही क्लिप ट्विट केली असून, माळशिरस विधानसभेतील मारकडवाडी गावातील उत्तम जानकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा बॅलेट पेपर मतदानाचा हेतू या क्लिप द्वारे स्पष्ट होत आहे. फक्त EVM पेटीवर घालवायचंय असं सातपुते यांनी म्हटलं आहे.

गावामध्ये मंगळवारी मतदानप्रक्रियेला सुरूवात झाली आहे. माळशिरस मतदारसंघात असलेल्या गावामध्ये मतदान पुन्हा होत आहे. याचं कारण म्हणजे ग्रामस्थांनी आपल्या गावात मतदान कमी झाल्याने त्यांनी ही निर्णय घेतला. या मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते आणि शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांच्यात लढत झाली होती. जानकर यांनी विजय मिळवला तरीसुद्धा गावामध्ये अपेक्षित मतदान कमी का झालं? ईव्हीएमवर शंका उपस्थित करत पुन्हा मतदान घेत आहेत. त्याआधी भाजप नेते राम सातपुते यांनी एक ऑडिओ क्लिप ट्विट करत बॉम्ब फोडलाय.

अजित पवार हाजीर हो!, निवडणुका संपताच कोर्टाने बजावले समन्स, काय आहे प्रकरण?

राम सातपुते यांनी केलेल्या ट्विटमध्ये उत्तन जानकर यांचे कार्यकर्ते आबा सोपान मारकड आणि मारकडवाडी नागरिक यांच्यातील असल्याचं राम सातपुते यांनी म्हटलं आहे. उत्तम रावांनी आम्हाला बोलावून घेतलं. मारकडवाडीचं मतदान वाया का गेलं? मारकडवाडी मला सोडत नाही, मशीनचा दोष आहे. मी उत्तमराव यांचं गावात कोणी केलं नाही इतकं काम केलं असंही ते म्हणालेत.

निवडणूक झाली, गावात इलेक्शन घ्यायचं ठरलंय. इलेक्शन म्हणजे खरंच उत्तमरावांना मतदान विरोधात गेलं की पेटीचा दोष असेल, पेटीवर घालवायचं. फायदा झाला पण तुमचा तोटा झालाय. पण मी सांगतोय म्हणून तुम्ही आपदा, यातून काही निष्पन्न होणार नाही पण आम्ही सांगतोय म्हणून मतदान करा, असं उत्तमराव यांचा कार्यकर्ता मारकडवाडीतील ग्रामस्थाला सांगत आहे.

 

 

follow us