Rohini Paradhye : सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील रिल्सस्टार रोहिणी पाराध्ये (Rohini Paradhye) हिने आपलं आयुष्य संपवल्याने सोशल मीडियावरील फॉलोअर्सह सर्वांनाच तिने आयुष्य संपवलं? असा प्रश्न पडलायं. ब्रम्हापुरी येथील ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात रोहिणीने गळफास घेतलायं. या घटनेमुळे सोलापुरसह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली.
रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन 6 चा भव्य आणि दिमाखदार समारोप
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे फेमस रील स्टार रोहिणी पाराध्ये हिनं गळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी आता पोलीस मृत्यूच्या कारणाचा शोध घेऊ लागले आहे. ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावानं व्यवसाय करत असणाऱ्या आपल्याच हॉटेलात रोहिणीनं टोकाचं पाऊल उचललं. हॉटेल व्यवसायाच्या शाखा वाढल्या आणि यातून आलेल्या तणावामुळे आणि झालेल्या वादामुळे रोहिणीनं रागात आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील हॉटेल ग्रामपंचायत याच ठिकाणी रोहिणी पती निलेश यांच्यासोबत राहत होती. सोमवारच्या दिवशी हॉटेलच्या साप्ताहिक सुट्टीनंतर मंगळवारी हॉटेल ग्रामपंचायत हे उघडलेच गेले नाही. याच दरम्यान दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रोहिणीने स्वतःच्या स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आलं.
निलेश आणि रोहिणी यांचा प्रेमविवाह झाला होता. आंतरजातीय विवाह केल्यानंत दोघेही अनेक दिवस पुण्यात वास्तव्यास होते. पुण्यात असतानाच दोघेही रील करू लागले.त्यानंतर मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावानं हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेलमधील रोजच्या खेळीमेळीच्या वातावरणातील रील बनवून रोहिणी आणि निलेश दोघेही प्रसिद्ध झाले आणि त्यांचं हॉटेलही यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलं.
रोहिणी आणि निलेश यांनी मंगळवेढा तालुक्यातच दोन ठिकाणी नव्यानं हॉटेलच्या शाखा सुरू केल्या. मात्र, या दोन्ही शाखांचं व्यवस्थापन करणं, जिकरीचं होत असतानाच. आर्थिक घडी नीट बसवणं आणि शाखा चांगल्या चालवणं, अशा गोष्टींची तारेवरची कसरत होत होती. यातूनच दोघांत वाद आणि तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. रोहिणीनं हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी चर्चा आहे.
दरम्यान, रोहिणीचा निलेश सोबतच दुसरा विवाह असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नीलेशसोबत प्रेमविवाह झाल्यावर नक्की कुठल्या कारणानं तिनं हे टोकाचं पाऊल उचललं? नक्की दोघांमधील मतभेद होता की, अन्य कुठलं वेगळं कारण होतं का? यावरुन अंदाज लावला जात आहे.
