Download App

Gautami Patil : ‘लोककलेची गौतमी पाटील करू नका’ अन्यथा…

Gautami Patil : सध्या महाराष्ट्रातील एक अत्यंत चर्चेतील नाव म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील होय. सध्या तिच्या कार्यक्रमांची भुरळ प्रेक्षकांवर पडली आहे. तिच्या अदाकारी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात व या कार्यक्रमांमध्ये राडे देखील होतात. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये विविध कलावंतांच्या मानधनावरून टीका टीपण्णी सुरू आहे.

याला सुरूवात झाली. ती किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते म्हणाले होते की, गौतमी पाटिलच्या कार्यक्रमासाठी लाखोंनी पैसे मोजणारे लोक किर्तनासाठी नुसते 5 हजार रुपये वाढवून मागितले तर कटकट करतात. त्यानंतर यावर विविध स्तरावरून टीका झाली. स्वतः गौतमी पाटीलने देखील यावर अपली प्रतिक्रिया दिली होती.

आता या कलावंतांच्याा मानधनावर ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट गौतमी पाटीलवर टीकास्त्र सोडत तिला मिळत असणाऱ्या रग्गड मानधनावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ‘अनेक ग्रामस्थ 100 लोकांच्या तमाशाला 2 लाख द्यायला गयावया करतात. पण गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात 4 मुली आणि पाचवी गौतमी यांना 5-5 लाख रूपये मोजतात. याला काय म्हणायचं? तसेच लोक कलेची गौतमी पाटील करू नका अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल.’ अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त करून दाखवली.

गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून रेड सिग्नल… गौतमी म्हणाली, मी पुन्हा येईन

दरम्यान दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता गौतमीचा एका कार्यक्रमाच्या परवानगीला पोलिसांकडून नाकारण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अन्नापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यानंतर गौतमीने आपल्या चाहत्यांसमवेत संवाद साधत मी पुन्हा या गावात नक्की येईन असे आश्वासन दिले. मात्र कार्यक्रम रद्द झाल्याने गौतमीचे चाहते कमालीचे नाराज झाले होते.

Tags

follow us