गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून रेड सिग्नल… गौतमी म्हणाली, मी पुन्हा येईन

गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून रेड सिग्नल… गौतमी म्हणाली, मी पुन्हा येईन

Gautami Patil : सध्या महाराष्ट्रातील एक अत्यंत चर्चेतील नाव म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील होय. सध्या तिच्या कार्यक्रमांची भुरळ प्रेक्षकांवर पडली आहे. तिच्या अदाकारी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात व या कार्यक्रमांमध्ये राडे देखील होतात. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता गौतमीचा एका कार्यक्रमाच्या परवानगीला पोलिसांकडून नाकारण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अन्नापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यानंतर गौतमीने आपल्या चाहत्यांसमवेत संवाद साधत मी पुन्हा या गावात नक्की येईन असे आश्वासन दिले. मात्र कार्यक्रम रद्द झाल्याने गौतमीचे चाहते कमालीचे नाराज झाले होते.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अण्णपूर या गावाची यात्रा आहे. या यात्रेनिमित्त तमाशा ठेवण्याची गावाची परंपरा आहे. मात्र गेली कित्येक वर्ष या गावात तमाशाच्या कार्यक्रमात अनेकदा वादविवाद झाल्याचा इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी आधीच तयारी केली होती. यातच यात्रेनिमित्त गौतमी पाटील गावात येणार म्हंटले तर धुडगूस होणार हे समीकरण ठरलेले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर

त्यामुळे शिरूर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमास ऐनवेळी परवानगी नाकारली. दरम्यान गौतमीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने तिचे चाहते कमालीचे नाराज झाले होते. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आयोजकांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम रद्द करून तिची सहकरी हिंदवी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन केले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

कमी कपड्यांमध्ये मुली शूर्पणखासारख्या दिसतात, भाजप नेत्याचे पुन्हा वादग्रस्त विधान

गौतमी म्हणाली…मी पुन्हा येईन
गौतमी पाटील पहिल्यांदाच कार्यक्रमस्थळी येऊनही तिला तिच्या नृत्याचा जलवा तिच्या चाहत्यांसाठी सादर करता आला नाही. मात्र यावेळी गौतमी हिच्या ऐवजी हिंदवीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गौतमीचा कार्यक्रम रद्द झाल्यास समजताच रसिकांमध्ये नाराजी पसरली. मात्र, गौतमीने कार्यक्रम स्थळी हजेरी लावून प्रेक्षकांशी संवाद साधला आणि आपल्याला कार्यक्रम करता न आल्याने तिने तिच्या चाहत्यांची दिलगिरी व्यक्त केली. मी पुन्हा लवकरच या गावात येईल आणि पुढच्या वेळी नक्की डान्स करेल असे आश्वासन गौतमीने चाहत्यांना दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube