Relief for the accused in the 2006 Malegaon blast All four accused acquitted by High Court : 2006 मध्ये मालेगावमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणातील आरोपींना दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रकरणातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींविरोधातील आरोप निश्चित करण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत.
Maharashtra Politics : विधान परिषदेच्या 9 जागा अन् 43 नाव; विदर्भातील एका नेत्याची सरप्राईज एन्ट्री?
या प्रकरणामध्ये राजेंद्र चौधरी, धान सिंह , लोकेश शर्मा आणि मनोहर नरवारीया हे चार आरोपी होते. दरम्यान या एनआयएला या चौघांविरूद्ध प्रत्यक्ष घटना पाहिलेला एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाला नव्हता. तसेच इतर आरोपींची जी सुटका करण्यात आली होती. ती पुर्णपणे बेकायदेशीर होती. असा युक्तीवाद या चार आरोपींच्या वकिलाने केला होता.
“डिटेक्टिव्ह धनंजय” मध्ये आदिनाथ कोठारे डिटेक्टिव्हच्या भूमिकेत! पाहा खास फोटो…
दरम्यान या 2006 मध्ये मालेगावमध्ये झालेल्या स्फोटात 31 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सत्र न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये आरोपींविरोधातील आरोप निश्चित करण्यात आले होते. ज्यामध्ये हत्या आणि गुन्हेगारीचा कट रचल्याचे आरोप होते. मात्र आता या प्रकरणातील आरोपींना दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रकरणातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
