Maharashtra Politics : विधान परिषदेच्या 9 जागा अन् 43 नाव; विदर्भातील एका नेत्याची सरप्राईज एन्ट्री?
Maharashtra MLC Election पक्षात अनेक निष्ठावंत इच्छुक असतानाही विदर्भातील या नेत्यासाठी पायघड्या का घातल्या?
Maharashtra MLC Election 2026 : विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी रणधुमाळी उडणार असून, या 9 जागांसाठी तब्बल भाजप, शिंदेंची सेना, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या पक्षासह एकूण 43 नावांची चर्चा आहे. पण, या 43 नावांपैकी एका नावाने थेट सत्तेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ते नाव म्हणजे विदर्भाचे आक्रमक नेते आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांचे. गेल्या काही काळापासून मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असलेले आणि सरकारला घरचा आहेर देणारे बच्चू कडू यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कोट्यातून विधान परिषदेची ‘मोठी ऑफर’ दिल्याची माहिती समोर येत आहे. पक्षात अनेक निष्ठावंत इच्छुक असतानाही, शिंदेंनी विदर्भातील या ‘जननेत्या’साठी पायघड्या का घातल्या? यामागे केवळ मैत्री आहे की, काही मोठं राजकीय गणित? याबद्दल जाणून घेऊया…
मुनंगटीवार-जोरगेवार वादासमोर प्रदेशाध्यक्षांनी हात टेकले; आता थेट अमित शाह फैसला करणार
कडू यांना ऑफर देण्याची 5 कारणं?
1. डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न : आता बच्चू कडू यांच्या नावाची शिंदेंच्या पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण, गेल्या काही काळापासून बच्चू कडू हे महायुती सरकारवर विशेषतः मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अनेकदा त्यांनी जाहीरपणे आपली आक्रमकता दाखवली होती. ही नाराजी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला महागात पडू शकते. त्यामुळे बच्चू कडू यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांची नाराजी कायमची दूर करण्याची ही शिंदेंची चाल मानली जात आहे.
2. विदर्भातील ताकद टिकवून ठेवणे : बच्चू कडू यांचा विदर्भात, विशेषतः अमरावती जिल्ह्यात मोठा प्रभाव आहे. त्यांच्या ‘प्रहार’ संघटनेचे जाळे ग्रामीण भागात मजबूत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विदर्भातील जागा जिंकण्यासाठी बच्चू कडूंसारखा आक्रमक चेहरा सोबत असणे शिंदेंसाठी फायद्याचे ठरेल. त्यामुळेच कडू यांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
3. अपक्ष आणि छोट्या पक्षांची मोट : एकनाथ शिंदे यांना विधानसभेत अनेक अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. बच्चू कडू हे या गटातील एक महत्त्वाचे नेते आहेत. कडूंना संधी देऊन शिंदेंचा एकप्रकारे इतर मित्रपक्षांना जे आमच्यासोबत संकटात उभे राहिले, त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असाच संदेश देण्याचा प्रयत्न आहे. शिंदेंच्या या भूमिकेमुळे मित्रपक्षांमधील विश्वास वाढण्यास मदत होईल.
4. हक्काची मते आणि ‘धक्कातंत्र’ : विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयासाठी 28 मतांची गरज असते. शिंदेंकडे स्वतःचे 57 आमदार आहेत, ज्यामुळे त्यांच्या दोन जागा सहज निवडून येऊ शकतात. कडूंना उमेदवारी देऊन शिंदे केवळ स्वतःचेच नाही, तर कडूंच्या ‘प्रहार’चे आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या इतर आमदारांची मतेही महायुतीच्या पारड्यात सुरक्षित करण्याचा शिंदेंना मानस आहे. Maharashtra MLC Election 2026
5. शेतकरी आणि दिव्यांगांचा मुद्दा : बच्चू कडूंची ओळख शेतकरी आणि दिव्यांगांसाठी लढणारा नेता अशी आहे. त्यांना सोबत घेतल्याने सरकारची प्रतिमा ‘सामान्यांचे सरकार’ अशी अधिक ठळक होऊ शकते. आगामी निवडणुकीत प्रचारासाठी कडूंसारखा वक्ता सोबत असणे ही शिवसेनेची रणनीती असू शकते असेदेखील बोलले जात आहे.
तुमच्यात चांगदेवाचा अहंकार, ट्विटचा अर्थ सांगा; अंधारेंनी स्वीकारले फडणवीसांचे आव्हान
भाजपच्या भूमिकेकडे सर्वांची नजर
शिंदेंकडून कडू यांना दिलेल्या ऑफरची सध्या फक्त चर्चा आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण, जर शिंदेंनी खरचं कडू यांना अशाप्रकारची ऑफर दिली असेल तर, यावर आता भाजपची भूमिका काय असेल? हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. कारण महायुतीत जागावाटपावरून आधीच रस्सीखेच सुरू आहे. त्यात बच्चू कडू यांनीदेखील अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, पण जर ही युती झाली, तर विधान परिषदेचे रणांगण अधिकच रंजक होणार यात शंका नाही.
विधानपरिषदेसाठी एक नाव फिक्स; शिंदेसेनेत दुसऱ्या जागेसाठी चुरस…
43 जणांच्या नावांमध्ये कोण कोण?
भाजपकडून कोणती नावं चर्चेत
– माधवी नाईक
-राजेश पांडे
– रणजितसिंह निंबाळकर
– राम सातपुते
– संजय काका पाटील
– संजय केणेकर
– प्रज्ञा सातव
– अर्चना पाटील चाकूरकर
– दादाराव केचे
– संजय भेंडे
– संदीप जोशी
– दयाशंकर तिवारी
शिंदेंची शिवसेनेकडून कोणती नावं चर्चेत
– नीलम गोऱ्हे
– रविंद्र फाटक
– संजय मोरे
– किरण पावसकर
– शीतल म्हात्रे
– शायना एनसी
– दिपक सावंत
– बच्चू कडू
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार?; धुसफूस, पेच अन् सस्पेन्स…
राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून कोणती नावं चर्चेत
– झिशान सिद्धिकी
– उमेश पाटील
– संजय दौंड
– सुरेखा ठाकरे
– आनंद परांजपे
– सुरेश बिराजदार
– राजेंद्र जैन
ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणती नावं चर्चेत
– उद्धव ठाकरे
– अंबादास दानवे
– सुषमा अंधारे
– विनायक राऊत
– राजन विचारे
– वैभव नाईक
– सूरज चव्हाण