Download App

मी DyCM पदाच्या शर्यतीत नाही, शिंदेंनंतर आता मुलगा श्रीकांत शिंदेंची मोठी घोषणा

या सर्व विषयावर आता श्रीकांत शिंदे यांनी ट्वीट करत खुलासा केला आहे. ते म्हणाले, महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे

  • Written By: Last Updated:

Srikant Shinde on DCM Post : राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू होतील अशी स्थिती होती. परंतु, असं न होता कोण मुख्यमंत्री होणार आणि कोण (Srikant Shinde ) उपमुख्यमंत्री होणार यावरून मोठी चर्चा रंगली आहे. ही चर्चा अध्यापपर्यंत थांबलेली नाही. दरमम्यान, यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा रंगली होती. तसंच, त्यावरूनच हे सगळ राजकारण सुरू आहे असंही बोललं जात होतं. मात्र, अखेर या सर्व चर्चांना स्वत: श्रीकांत शिंदे यांनी पूर्णविाम दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार; गृहखातं कुणाकडं राहणार? एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?

या सर्व विषयावर आता श्रीकांत शिंदे यांनी ट्वीट करत खुलासा केला आहे. ते म्हणाले, महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.

माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा… असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी अनेक दिवसांपासून त्यांच्याविषयी चाललेल्या चर्चेवर पडदा टाकला आहे.

follow us