Download App

राष्ट्रवादीत राजीनामा नाट्य तर भाजपकडून ऑफर, बावनकुळे म्हणाले…

आमच्याकडे कुणीही पक्षप्रवेशासाठी आलं तर आमचे दरवाजे उघडेच असल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर करताच राजकीय वातावरण ढवळून निघालंय. शरद पवारांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आपणही राजीनामा देणार असल्याचा पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. अशातच आता भाजपकडूनही प्रवेशासंदर्भात हालचाली सुरु झाल्याचं दिसून येतंय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान करीत एक प्रकारे कार्यकर्त्यांना ऑफर दिली, असं बोललं तरी वावगं ठरणार नाही.

KL Rahul Ruled out of IPL: लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! केएल राहुल आयपीएल 2023 मधून बाहेर?

बावनकुळे म्हणाले, आम्ही कुणालाही नाही म्हणत नाही. आम्ही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहोत. आमच्या पक्षात कुणीही यायला तयार असेल तर आम्ही कधीही कुणाचा पक्षप्रवेश थांबवत नाही, जो जो पक्षात येईल त्याला आम्ही पक्षात घेणार असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.

तसेच ज्या नेत्याने 50 वर्ष पक्षाचं नेतृत्व केलं आहे, त्यांनी निर्णय घेतला की दुसऱ्याला अध्यक्ष करायचं तेव्हा आपले भावनात्मक संबंध असतात त्यामुळे लोकांना वाईट वाटतं. त्यामुळे पक्षात राजीनामा नाट्य असेल, पण राष्ट्रवादीतील कुणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. आमच्याकडे कुणीही आलं नाही. कुणाच्याही पक्षप्रवेशाची काहीही चर्चा झाली नाही आणि आमच्यातील कुणीही राष्ट्रवादीतील नेत्यांशी संपर्क केला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Kiran Mane: ‘TDM अन् महाराष्ट्र शाहीर’ यावरून किरण मानेंची ‘ती’ पोस्ट जोरदार चर्चेत

ज्या नेत्याने ५० वर्ष पक्षाचं नेतृत्व केलं आहे, त्यांनी निर्णय घेतला की दुसऱ्याला अध्यक्ष करायचं तेव्हा आपले भावनात्मक संबंध असतात त्यामुळे लोकांना वाईट वाटतं. त्यामुळे पक्षात राजीनामा नाट्य असेल. पण राष्ट्रवादीतील कुणीही आमच्याशी संपर्क साधला नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

दररम्यान, शरद पवारांनी जे काम केलं आहे, त्यांच्या कामाचे भावनात्मक संबंध लोकांशी आहेत. त्यामुळे शरद पवारांनीच अध्यक्ष राहिलं पाहिजे, त्यांनीच पक्ष चालवला पाहिजे, असं त्यांना वाटतं, असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us