Chandrashekhar Bawankule On Revenue Officers Attendance : महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आता रोज फेस ॲपद्वारे हजेरी लागणार आहे. तलाठ्यापासून आता उपजिल्हाधिकारी अधिकाऱ्यांपर्यंत फेस (Revenue Officers Attendance) ॲपद्वारे हजेरीचं बंधन असेल. ॲपवर हजेरी न लागल्यास गैरहजर समजलं जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) हा एक मोठा निर्णय आता घेतलेला आहे. ज्या गावात नोकरी आहे, तिथूनच उपस्थिती लावली लागणार आहे.
महसूल विभागाचे सर्व अधिकारी फेस ॲपवर येतील. ज्या गावात त्यांची नोकरी आहे, त्या गावात जावून त्याला फेसॲपवर प्रेझेंटी लावावी लागेल, तिथे हजेरी लागली तरच त्यांचा पगार निघेल. अन्यथा ऑगस्टचा पगार निघणार नाही. फेस ॲप अनिवार्य आहे, ज्या दिवशी फेस ॲपवर नोंदणी केली नाही. त्या दिवशी तो कर्मचारी गैरहजर आहे, असं समजण्यात येईल.
कोकाटेंच्या करेक्ट कार्यक्रमाची तारीख ठरली; तिजाची वेळ म्हणत अजितदादांनी तलवार उपसलीच
सरकारी कर्मचारी ‘फेसॲप’वर
महाराष्ट्र सरकारने महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आता ‘फेसॲप’द्वारे हजेरी अनिवार्य केली आहे. तलाठीपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि नोंदणी कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना रोज सकाळी फेसॲपवर उपस्थिती नोंदवावी लागणार आहे. याची अंमलबजावणी ऑगस्टपासून सुरू होणार असून, हजेरी नोंदवली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांचा पगार रोखण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महसूल मंत्री यांनी दिला आहे.
राज्य शासनाने यापूर्वीच सूचित केले होते की, कामावर हजर असल्याचे एकमेव प्रमाण म्हणजे ‘फेसॲप’वरची हजेरी असेल. यामुळे यंत्रणेत पारदर्शकता येईल आणि मनमानी गैरहजेरी रोखता येईल, असा प्रशासनाचा दावा आहे.
कोण म्हणतं संधी शोधावी लागते? अभिनेत्री किरण खोजेच्या आयुष्यानं तिला शोधलं..
पावसाळ्यात आंदोलन नको
प्रहार आंदोलनावर बोलताना बावनकुळे यांनी म्हटलंय की, आमच्या बच्चू कडूंसोबत बैठका झाल्या आहेत. त्यांचं बऱ्यापैकी समाधान झालंय. सकाळी त्यांचा मेसेजे होता. दिव्यांग मानधन वाढवण्याचा निर्णय झाला. तो अधिवेशनाता जाहीर झाला. कर्जमाफीची मागणी होती, त्यासाठी एसओपी तयार केली जात आहे. मी सरकारच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. त्यांनी आंदोलन करू नये. परिपत्रक काढण्याचे काम सुरु आहे. पावसाळ्यात आंदोलन नको, सरकार तुमचे ऐकत आहेत, असं देखील बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय.