6,000 हुन अधिक सायकलस्वारांच्या उपस्थितीत पार पडली ‘राईड टू एमपॉवर मुंबई सायक्लोथॉन 2025’

5 राईड प्रकारांचा समावेश असणारी 'राईड टू एमपॉवर मुंबई सायक्लोथॉन 2025' 6 हजारांपेक्षा अधिक सायकलस्वारांच्या भव्य उपस्थितीत मुंबईत पडली पार

Untitled Design (33)

Untitled Design (33)

Ride To M Power Mumbai Cyclothon 2025 : लोहा फाउंडेशनच्या वतीने, फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली राईड टू एमपॉवर मुंबई सायक्लोथॉन 2025 आज सकाळी एमएमआरडीए ग्राउंड्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे 6,000 हून अधिक सायकलस्वारांच्या भव्य उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यक्रमात प्रथमच सायकल चालवणारे, सायकलिंगप्रेमी, कुटुंबीय तसेच पॅरा-खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी एकजुटीचा सशक्त संदेश दिला. बॉलिवूड अभिनेता व फिटनेस आयकॉन सुनील शेट्टी(Sunil Shetty), ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफ(Jackey Shrof), कृष्ण प्रकाश (IPS), ADG फोर्स वन, प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन आणि अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhary) यांनी हिरवा झेंडा दाखवून या सायक्लोथॉनची सुरुवात केली, ज्यामुळे मानसिक आरोग्यास समर्पित या भव्य सामुदायिक राइडला प्रेरणादायी प्रारंभ मिळाला.

देशात, विशेषतः तरुणांमध्ये, मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये मोठी वाढ होत असताना राईड टू एमपॉवर मुंबई सायक्लोथॉन सारख्या जनउपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती साध्य केली जात आहे. नीरजा बिरला (Niraja Birla) यांच्या स्थापनेखाली कार्यरत असलेली भारतातील आघाडीची मानसिक आरोग्य संस्था एमपॉवर यांनी या कार्यक्रमाद्वारे भावनिक आरोग्याविषयी खुले संवाद प्रोत्साहित केले, मानसिक आजारांभोवती असलेला कलंक कमी करण्यासाठी योगदान दिले आणि वेळेत मदत घेण्याची प्रवृत्ती वाढवली. मानसिक आरोग्याच्या प्रचाराला एका ऊर्जादायी, समुदाय-संचालित फिटनेस उपक्रमाशी जोडून, एमपॉवर यांनी हे ठामपणे अधोरेखित केले की मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे आणि सामूहिक प्रयत्नांमधून सकारात्मक सामाजिक बदल घडवता येतात.

या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे राईड टू एमपॉवर मुंबई सायक्लोथॉनच्या निमित्ताने इंडिया पोस्टने जारी केलेला स्मारक स्पेशल कॅन्सलेशन स्टॅम्प. याचे अनावरण सुनील शेट्टी, महिमा चौधरी आणि दीपशिखा बिरला, हेड ऑफ नॉर्थ डिव्हिजन, इंडिया पोस्ट यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यामुळे मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी या उपक्रमाचे अधिकृत स्वरूपात योगदान अधोरेखित झाले. हा स्पेशल कॅन्सलेशन स्टॅम्प एक दिवसासाठी जीपीओ, फोर्ट येथे वापरात असेल.

या सायक्लोथॉनमध्ये पाच राइड प्रकारांचा समावेश होता. 100 किमी, 50 किमी, 25 किमी, 10 किमी आणि विशेष व्हीलचेअर राइड. सहभागींसाठी कस्टम सायकलिंग जर्सी, फिनिशर मेडल, ई-टाईमिंग सर्टिफिकेट, वैयक्तिक फोटो, हायड्रेशन सपोर्ट तसेच मार्गावर वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमस्थळी मानसिक आरोग्य जनजागृती कियोस्क, झुंबा सेशन्स, लाईव्ह म्युझिक, हेल्दी ब्रेकफास्ट झोन आणि लोकप्रिय चॅरिटी BIB उपक्रम राबवण्यात आला, ज्याद्वारे एमपॉवरच्या मानसिक आरोग्य कार्यक्रमांसाठी निधी गोळा करण्यात आला.

Exit mobile version