Download App

Road Accident : भीषण अपघात! मिनी बस 60 फूट खोल दरीत कोसळली; एकाचा मृत्यू

Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत (Road Accident) मोठी वाढ झाली आहे. आताही शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात वारवंड ते शिरगावदरम्यान मिनी बसला अपघात झाला. बस रस्ता सोडून धरणाच्या बाजूला 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली. परंतु, धरणाच्या पाण्यापासून पाच फुटांवर बस अधांतरी अडकल्याने मोठा अनर्थ टळळला. तरी देखील या अपघातात एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

पुणे शहराजवळील वरंधा घाटात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. भोर-महाड मार्गावरील घाटात बस एका वळणावर असतान दरीत कोसळली. बसमधील प्रवासी झोपेत होते. अचानक बसला हादरे बसू लागल्याने त्यांची झोप उडाली अन् पाहतो तर बस कोसळत असल्याचे दिसले. त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले. खाली नीरा देवघर धरण होते. त्या धरणात बस मात्र पडली नाही. झाडा झुडूपांत अडकली.

सिक्कीम पूर: लष्कराच्या 8 जवानांचे मृतदेह सापडले, राजनाथ सिंह यांनी केला शोक व्यक्त

ही खासगी बस पुण्यातील स्वारगेट येथून कोकणात चालली होती. शनिवारी रात्री 2 वाजता बस वरंध घाटात आली. त्यावेळी घाटातील एका वळणावर असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस धरणाच्या बॅक वॉटर परिसरातड 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली. मात्र धरणाच्या पाण्याच्या वर असलेल्या झुडुपांत अडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही बस जर पाण्यात पडली असती तर मोठा अनर्थ झाला असता. यानंतर  तातडीन बचाव कार्य राबविण्यात येऊन बसमधील 10 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

या अपघाताची माहिती कळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघातातील जखमींना तातडीने भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच बऱ्याच उशीरानंतर बसही बाहेर काढण्यात आली. मात्र, या अपघातात एका जणाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.  बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आमचा डीएनए तपासायच्या आधी स्वत:चा डीएनए तपासा, तुमचा डीएन फिरोज…; अनिल बोंडेंची टीका

दरम्यान,महामार्गांवर वाहने भरधाव वेगात असतात. वेग नियंत्रित नसतो. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.

Tags

follow us