Rohit Pawar criticize Ram Shinde over District Cooperative Bank election : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येणाऱ्या काही दिवसांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी देखील लक्ष घातले आहे. आजी माजी नेत्यांच्या भेटीगाठी ते घेत आहे. आता यावरून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला आहे.
दररोज चार हजार कोटींहून अधिक नफा! जाणून घ्या देशाील सर्वात श्रीमंत आणि उद्योजक घराण्याची कमाईचं गणित
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले , निवडणुकीपूर्वी अनेक चर्चा या होतच असतात. मात्र जेव्हा निवडणुका जाहीर होतात तेव्हा अनेक बदल हे होत असतात . काही लोक उगाच आवाज करत असतात . काहीजण उगाच चर्चा करतात व पुढे जाऊन तडजोडी करतात . काहीजण विकासात्मक राजकारण करतात तर काहीजण केवळ चर्चा घडवून आणून आपण माध्यमांमध्ये झळकळों पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. जिल्हा बँकेची निवडणूक काही सोपी नाही याची त्यांनी नोंद घेतली पाहिजे, अशा शब्दात पवार यांनी राम शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
तलाठी भरती! मंत्री विखेंवर गुन्हा दाखलची मागणी करणार
तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब आम्ही यापूर्वी सांगितली होती. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले कि रोहित पवार खोटं बोलत आहे त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार… मात्र त्यानंतर आम्ही पुरावे दिले व हे सिद्ध देखील झाले होते कि काही लोकांनी पैसे घेऊन पेपर फोडले होते .
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे नाही तर माझं नाव द्या; नरेश म्हस्केंचा संजय राऊतांबद्दल सनसनाटी दावा
त्या प्रकरणाचा अंतिम निकाल हा येणाऱ्या काही दिवसांमध्ये जाहीर होईल . निकाल जाहीर झाला कि आम्ही त्यानंतर मंत्री विखे यांचा राजीनामा मागू तसेच तलाठी भरती मध्ये झालेला एवढा मोठा भ्रष्टाचार त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा का दाखल करू नये याबाबत आम्ही त्यांना प्रश्न नक्की विचारू अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी मंत्री विखेंना प्रत्युत्तर दिले.
