Download App

नेहमी महिलांचे मूळ मुद्दे बाजूला ठेवून राजकीय भूमिका…, रोहित पवारांची चाकणकरांवर कारवाईची मागणी

रोहित पवारांनी महिलांचे मूळ मुद्दे बाजूला ठेवून नेहमी राजकीय भूमिका घेण्याची ख्याती मिळवलेल्या असं म्हणत टीका केली आहे.

  • Written By: Last Updated:

Pranjal Khewalkar Rave Party Case : राज्याच्या महिला आयोगाच्या (Rave) अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये, आयोगाकडे प्राप्त अहवालानुसार प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो असल्याचे सांगत मानवी तस्करीची माहिती चाकणकर यांन दिली. मात्र, चाकणकर यांना ही माहिती दिल्याने त्यांच्यावरच डाव उलटण्याची शक्यता आहे.

ही माहिती देण्याचा अधिकार चाकणकर यांना नाही, हे राईट टू प्रायव्हसी अधिकाराचं उल्लंघन असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर, आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत रुपाली चाकणकर यांच्याकडून गंभीर गुन्हा घडल्याचं म्हटलं आहे. पुण्यातील कोथरुडमध्ये दलित मुलींवर पोलिसांकडून झालेल्या शेरेबाजीप्रकरणाची गंभरतीने दखल घेतली नाही. मात्र, या मुलीची ओळख सार्वजनिक करत बीएनएस एस 72 नुसार गंभीर गुन्हा केल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

राईट टू प्रायव्हसीचं उल्लंघन! रेव्ह पार्टी प्रकरणी सुप्रिया सुळे भडकल्या, रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाई

 

 

follow us