Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार विदर्भाच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी विदर्भातून येणाऱ्या प्रफुल्ल पटेलांवर आणि आमदारांच्या सह्यांवरून अजित पवारांवर निशाणा साधाला आहे. यावेळी रोहित पवारांनी सांगितलं की, नागपूरला विदर्भातील पदाधिकारी, कार्यकर्ते जे पवार साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवतात. त्यांच्या भेटी घेणार. पुढच्या महिन्यात 3 ते 4 तारखेला प्रत्येक जिल्ह्यात जाणार आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत.
Vietnam Fire : व्हिएतनाममध्ये अग्नितांडव! 50 जणांचा होरपळून मृत्यू
रोहित पवारांनी अजितदादा, पटेलांना सुनावले…
या दौऱ्या दरम्यान रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांवर आणि अजित पवारांवर निशाणा साधाला. ते म्हणाले की, ज्यांनी विचार बदलला जे भाजप विरोधात बोलले ते आज भाषण करण्यासाठी काहीही बोलत असेल तर ते खरं समजायला नको. अनेक वेळा आमदारांचे सही कागदांवर घेतल्या. आमचे नेते घेत असल्याने आम्ही विश्वास केला. त्याचा हा वापर होईल असं वाटलं नव्हतं. असं म्हणत रोहित यांनी अजितदादांना सुनावले.
Fighter चित्रपटात दिसणार अभिनेता करणसिंह ग्रोव्हर अन् अक्षय ओबेरॉय?
त्याचबरोबर पटेलांवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, विदर्भाची जवाबदारी ज्या नेत्याला दिली. तो फक्त जिल्हा पर्यंत राहू शकला. त्याला साहेबांनी केंद्रात जवाबदारी दिली. त्यांनी साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले नाही. पार्टीला त्यांचा फायदा झाला नाही. त्याचबरोबर यावेळी अजित पवारांच्या कंत्राटी भरतीबाबतच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, जे चाळीस आमदार शिंदे गटासोबत गेले त्यांच्या सुरक्षेवर वर्षात दीडशे कोटी खर्च, जाहिरातीवर 50 कोटी, शासन आपल्या दारी एका सभेला 10 कोटी खर्च येतो हे खर्च कमी करा. आजचे नेते राज्य चालवायला सक्षम नाही. तीस लाख तरुण नोकरीसाठी प्रयत्न करत आहे ही त्यांची चेष्टा आहे. अशी टीका रोहित यांनी केली.
त्याचबरोबर यावेळी रोहित यांनी अजित पवार गटातील रूपाली चाकणकर आणि अमोल मिटकरींवरही टीका केली. ज्यांना फक्त राजकारण कळतं त्यावर. त्यांना उत्तरं देऊन लोकांचा वेळ आम्हाला घ्यायचा नाही. माझे पहिलं समर्थन होतं असं म्हणतात. पण मला आता त्याच्यावर जास्त बोलून वेळ वाया घालवायचा नाही. आमचं वय कमी आहे अस वाटत असेल तरी आम्ही लहान वयात शाहू, फुले आंबेडकर यांचे विचार जपले, हे अनुभवी असताना विचार का जोपासले नाही? असा सवाल रोहित पवार यांनी मिटकरींना केला.