Fighter चित्रपटात दिसणार अभिनेता करणसिंह ग्रोव्हर अन् अक्षय ओबेरॉय?

Fighter चित्रपटात दिसणार अभिनेता करणसिंह ग्रोव्हर अन् अक्षय ओबेरॉय?

Fighter: सिद्धार्थ आनंदचा ‘फायटर’ (Fighter Hindi Cinema) हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट अशा प्रकारचा पहिला एरियल कॉम्बॅट चित्रपट असणार आहे, आणि उच्च दर्जाचे अ‍ॅक्शन सीक्वेन्स या चित्रपटात बघायला मिळणार आहे. या सिनेमाबाबत अजून एक खास बातमी समोर येते ती म्हणजे करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) आणि अक्षय ओबेरॉय (Akshay Oberoi) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, “करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय हवाई दलातील हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या लढाऊ संघाचा एक भाग असतील. ‘फायटर’ च्या कथेत ही दोन पात्र मुख्य भूमिका बजावणार आहेत. चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरनंतर आता ही एक बिग ब्रेकिंग ठरते आहे.

‘द स्पिरिट ऑफ फायटर’ नावाचे मोशन पोस्टर २०२३ च्या स्वातंत्र्यदिनी प्रसिद्ध झाले आणि सोशल मीडिया वर चर्चांना सुरूवात झाली. सिद्धार्थ आनंद यांनी जास्त माहिती उघड न करता BTS ची खास झलक शेअर केली आहे. फायटर स्टार हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे आणि सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद यांनी त्यांच्या बॅनरखाली Marflix Pictures सोबत Viacom18 Studios सोबत निर्मिती असलेला हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे.

Scoop : हंसल मेहताच्या ‘स्कूप’ बुसानच्या ग्लोबल ओटीटी पुरस्कारांमध्ये दाखल

करण आणि अक्षय यांनी देखील हा फोटो आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्याचे बघायला मिळत आहे. यावरुन दोघेही ‘फायटर’ चित्रपटात दिसणार असल्याची खात्री होते. सध्यातरी चित्रपटात करण आणि अक्षय यांची भूमिका नेमकी कोणती असणार आहे, याची माहिती समोर आली नाही. चित्रपटात हृतिक रोशनची भूमिका एका एअर फोर्स ऑफिसरची आहे. तर अनिल कपूरही या सिनेमात बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube