Rohit Pawar : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate)यांचा विधानसभेत मोबाइलवर जंगली रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील कोकाटेंच्या व्हायरल व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली. तर शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या व्हिडिओवरून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मराठी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत ‘सॅन होजे’मध्ये नाफा चित्रपट महोत्सव; विविध कार्यक्रमांची मेजवानी
तसेच जर तुमचे मंत्री असे वागत असतील, तर तुमचा तुमच्या मंत्र्यांवर कंट्रोल नाही का? असा सवालही रोहित पवारांनी केला.
रोहित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. कोकाटे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत आहेत. तुम्ही कुठंही रमी खेळा, आम्हाला काही देणंघेणं नाही. पण कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं ही जबाबदारी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेऊन दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत ते अहंकाराने बोलतात, शेतकऱ्यांना भिकारी म्हटलंय. त्यामुळे कोकाटेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवारांनी केली.
दावा भाजपाचा पण, शिंदेंच्या शिलेदाराची फिल्डिंग; पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश चिवटे फायनल?
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, अजितदादांना सांगायचं आहे की कृषिमंत्री बदला, एक वेळ तुम्हीच कृषिमंत्री व्हा, पण कोकाटेंचा राजीनामा घ्या, असं ते म्हणाले.
अजितदादांचा मंत्र्यांवर कंट्रोल नाही का?
अजितदादांवर यापूर्वी खोटे आरोप झाले होते, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता आणि प्राय़श्चित म्हणून अजितदादा कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ बसले होते. अजितदादांनी राजीनामा दिला त्यावेळेस पवारसाहेब अध्यक्ष होते. आता तुम्ही पक्षाचे प्रमुख आहात. जर तुमचे मंत्री असे वागत असतील, तर याचा अर्थ तुमच्या मंत्र्यांवर तुमचा कंट्रोल नाही, असं म्हणायचं का,? असा सवालही रोहित पवारांनी केला.
दौंड कला केंद्र गोळीबार प्रकरणावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. एका आमदाराच्या भावाने गोळीबार करून एका महिलेला इजा पोहोचवली आहे. जर पोलिस माहिती दडवत असतील तर ते योग्य नाही. सत्ताधाऱ्यांकडून दबाव आणला जात आहे.. पण, उद्या या गोष्टी खऱ्या ठरल्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी लागले. पीडितेवर दबाव आणला जात आहे, असा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला.