Download App

जयंत पाटील भाजपात जाणार? प्रश्न विचारताच रोहित पवार म्हणाले, सत्तेसाठी ते…

Rohit Pawar यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर बोलले आहे.

Rohit Pawar on Jayant Patil after resine as State President of NCP Sharad Pawar Party : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये खांदेपालट करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान या अगोदरच जयंत पाटील यांच्या अजित पवार गटात जाण्याच्या किंवा भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहेत. त्यामुळे या राजीनाम्याकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. यावर बोलताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार नेमकं काय म्हणाले पाहुयात…

त्याच्या मित्रांना बोलवायचा अन् माझ्यासोबत संबंध…, निमिषाची महदीबद्दल धक्कादायक माहिती

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार साहेबांची जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली आहे. त्याबैठकीत ठरलेल्याप्रमाणे सर्वकाही होत आहे. जयंत पाटील यांनी राजीनामा दिला म्हणून ते भाजपमध्ये जाणार असं काही नाही. जयंत पाटील देखील घाबरणारे नाही. आतापर्यंत साहेबांसोबत राहिले आहेत. पुढे देखील राहणार. सत्तेसाठी ते विचार सोडून जाणार नाही. असं रोहित पवार म्हणाले. तसेच मला प्रदेशाध्यक्ष व्हायचंय असं मी म्हणालो नाही. मला प्रदेशाध्यक्षपद नकोय. असं देखील माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले. नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार याबाबत माहिती नाही. याची घोषणा 15 जुलैला होणार असल्याची माहिती देखील आमदार रोहित पवार यांनी दिली.

मला प्रदेशाध्यक्षपद नको पण…, आमदार रोहित पवारांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

तर यावेळी पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, मला प्रदेशाध्यक्षपद नको. पक्षात मला छोटं पद मिळालं तरी देखील त्या पदाला मी न्याय देणार असं देखील आमदार रोहित पवार म्हणाले. जर मी हेच पद हवं ते नको असं म्हणालो तर पक्षात लोकशाही नसेल. पक्षात लोकशाही मार्गाने चर्चा होणार असेही यावेळी रोहित पवार म्हणाले.

follow us