Rohit Pawar On MPSC Online Exam: एमपीएससी पेपरफुटीनंतर स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले होते. पुण्यात आंदोलने झाली, आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. आमदार रोहित पवारही या आंदोलनात सहभागी होते. त्यांनी हा पेपरफुटीचा मुद्दा लावून धरला आहे. आता एमपीएससी (MPSC) परीक्षांच्या ऑनलाइन पद्धतीवरून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सोमेश्वरचा रणसंग्राम ! सुनेत्रा पवारांना बॅकफूटवर आणण्यासाठी नातवांच्या अडून शरद पवारांचा डाव ?
उच्चस्तरीय समितीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी ऑनलाइन परीक्षेला तीव्र विरोध दर्शवला आहे. ‘एक वर्ष ऑनलाइन परीक्षा होणार नसेल, तर त्यानंतर ती सुरू करण्याचा विचार आहे का?’ असा सवाल करत पवार यांनी सरकार आणि समितीला विद्यार्थ्यांची भूमिका गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले. तसेच ऑनलाइन परीक्षा लागू करण्याचा प्रयत्न झाल्यास विद्यार्थ्यांचा विरोध आणखी तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबद्दल रोहित पवारांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरुन आपले मत व्यक्त केले आहे.
SBI च्या रिपोर्टनुसार RBI ऑक्टोबरमध्ये दणका देणार; गृहकर्जदारांना मोठ्या धक्क्याचे संकेत!
काय आहे रोहित पवारांची पोस्ट
MPSC उच्चस्तरीय समितीचे सर्व सन्मानित सदस्य,
आपल्या सर्वांबद्दल आदर आहे, परंतु एवढे वर्षभर ऑनलाइन होणार नाही, हे समिती सदस्यांचे वक्तव्य पटले नाही. एवढे वर्षभर ऑनलाइन होणार नाही, म्हणजे एक वर्षानंतर ऑनलाइन होणार आहे का? असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.
वर्षभर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार नाही, ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी वारंवार मांडलेली भूमिका विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठीच भिमनवार साहेबांना ताकद दिली गेली आहे आणि समिती देखील ऑनलाईनच्या बाजूचीच भूमिका पुढं रेटणार असेल तर समितीचे पुढचे दौरेच विद्यार्थी होऊ देणार नाहीत. त्यामुळे आपण ऑनलाईन परीक्षेच्या विरोधातील विद्यार्थ्यांची भावना समजून घ्यावी.
एक वर्षच काय, पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या…
हम है मैदान में…!
जरांगेंच्या मुंबई मोर्चाच्या घोषणेनंतर बारस्कर आक्रमक; ‘हे आंदोलन इमेज ब्रँडिंगसाठी’
दरम्यान, MPSC परीक्षांच्या ऑनलाइन पद्धतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला विरोध पाहता सरकार आणि उच्चस्तरीय समितीसमोर आता मोठे आव्हान आहे. परीक्षा पद्धतीत कोणताही बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आक्षेपांचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेबाबत सरकार आणि समिती पुढे कोणती भूमिका घेते, याकडे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
