Download App

रोहित पवार पोरकट : लोकसभेच्या जागेवरुन आमदार प्रणिती शिंदेंनी सुनावलं

सोलापूर : कोण रोहित पवार? काही लोकांमध्ये पोरकटपणा असतो, आमदार म्हणून त्यांची पहिलीच टर्म आहे. त्यांना थोडे दिवस दिले की, मॅच्युरिटी येईल, या शब्दांत काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना सुनावले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ‘सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा’ अशी मागणी सोलापूर दौऱ्यादरम्यान केली होती. रोहित पवार हे सोमवारी सोलापूरच्या दौऱ्यावर हेाते. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा होणारा पराभव पाहून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, अशी मागणी केली होती.

Supriya Sule : ‘त्या आश्वासनाचे काय झाले’, जुन्या पेन्शन योजनेवरुन सुळेंचा थेट मोदींना प्रश्न

आम्ही सोलापूर सोडला तर बारामती मतदारसंघ सोडणार आहात का? असा सवाल काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीला आव्हान म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांना अडचणीत आणण्यासारखं असल्याचं महेश कोठे म्हणाले होते. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात मतदारसंघांवरुन खडाजंगी सुरु असल्याचं दिसून येत आहे.

मातोश्रीवर प्रवेश कसा झाला? ऐका किस्सा…

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शाब्दिक आणि आता फिजिकल हल्ले होत असून याचा आम्ही निषेध करत असल्याचंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय. राज्य सरकारकडून हल्ल्यांकडे गांभीर्याने पाहिलं जात नसल्याची टीकाही त्यांनी केलीय. तसेच महिला आमदारांवरच असे हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवालही त्यांनी केलाय.

Tags

follow us