रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार राहुल गांधींची भेटही घेतली; राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंचा खळबळजनक दावा

Rohit Pawar हे काही दिवसांतच काँग्रेसमध्ये जातील असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.

Rohit Pawar

Rohit Pawar

Rohit Pawar will join Congress soon, also met Rahul Gandhi NCP’s Sunil Shelke’s sensational claim :

नेमकं काय म्हणाले सुनील शेळके?

रोहित पवार गेल्या 3-4 महिन्यांपासून पक्ष आणि समाजामध्ये कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ते शरद पवार पक्षाचे असताना देखील ते शरद पवारांना सोडून काँग्रेसच्या राहुल गांधींचे नेतृत्व मान्य करत आहे. तसेच ते पक्षातील इतर नेत्यांना डावलून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात पक्ष पु्र्णपणे रसातळाला नेण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.

मला मुख्यमंत्र्यांची टिंगलटवाळीची भाषा शोभत नाही; राहुल गांधींवरून पवारांनी फडणवीसांना फटकारले !

आता ते दुसऱ्यांच्या पक्षामध्ये लक्ष घालून काही अंतर्गत कलह किंवा वाद निर्माण करता येतील का? यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच बारामतीच्या पोट निवडणुकीमध्ये रोहित पवारांनी किती नैतिकता दाखवली? फक्त सोशल मिडीया आणि इतर मिडीयासमोर येऊन फक्त प्रसिद्धीसाठी प्रचारासाठी आले. ते फक्त एक तास आले होते. तसेच ते पुर्णपणे काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. रोहित पवार हे आता जे शरद पवार पक्षाचे आमदार आहेत ते काही दिवसांतच काँग्रेसमध्ये जातील. त्यासाठी त्यांनी स्वत: दिल्लीत जाऊन राहुल गांधींची भेट घेतली. काँग्रेसच्या नेत्यांच्या देखील ते संपर्कात आहेत. तसेच बारामतीच्या पोट निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा करण्याचा हट्ट देखील रोहित पवारांचाच होता. असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.

Exit mobile version