माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलंय; रोहित पवार यांचा नरेश अरोरा यांच्यावर हल्लाबोल

अजित पवार यांच्या मीडिया व्यवस्थापनाशी संबंधित डिझाईन बॉक्स कंपनीचे नरेश अरोरा यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.

Untitled Design 3

Untitled Design 3

Rohit Pawar’s attack on Naresh Arora : महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांच्या कथित विमान अपघातप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत काही गंभीर आणि खळबळजनक आरोप केले. रोहित पवार यांनी असा दावा केला की, अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या दिशेने सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

मी भावनेच्या भरात बोलत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असतील, तर मग माझ्यावर सोशल मीडियावर संघटित पद्धतीने ट्रोलिंग का केले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी भाजपशी संबंधित काही ट्रोलर्सवर टीका करत समित ठक्कर यांचे नाव घेतले. माझ्यावर वेड लागल्याचा प्रचार केला जात आहे. होय, मला माझ्या काकांवरील प्रेमामुळे वेड लागले आहे. पण काही लोकांना पैशासाठी काम करण्याचे वेड लागले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

भिवंडी महापालिकेत सत्तानाट्य; भाजपमध्ये फूट, 9 नगरसेवक फुटले

तसेच, अजित पवार यांच्या मीडिया व्यवस्थापनाशी संबंधित डिझाईन बॉक्स कंपनीचे नरेश अरोरा यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. काही ‘कॅशबॉक्स’वाले लोक मला ट्रोल करत आहेत. त्यांना किती पैसा वापरायचा असेल तो वापरू द्या. आमच्यासोबत स्वाभिमानी मराठी जनता आहे, असे ते म्हणाले. रोहित पवार यांनी पुढे सांगितले की, अजित पवार यांच्या अपघाताची सत्यता समोर येण्यासाठी लोक स्वतः पुढाकार घेत आहेत.

माझे आजोबा मोठे होते, माझे काका मोठे होते आणि मी रोहित पवार आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी नागरिक माझ्यासोबत आहेत. हे लोक सत्य शोधण्यासाठी काम करत आहेत, असे ते म्हणाले. या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, या प्रकरणी पुढे काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version