Download App

Sadabhau Khot : ‘त्यांच्या’ घराणेशाहीला बारामतीकर कंटाळले 

पुणे : बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागले आहेत. सामाजिक कामाच्या नावाखाली बारामतीकर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता पाहत आहेत. परंतु, हे कुटुंब मात्र आपण सामाजिक काम करत आहोत, असा देखावा करत स्वतःचेच खिसे भरत आहेत. कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने शैक्षणिक संस्था निर्माण करून या कुटुंबाने बारामतीकरांना वाऱ्यावर सोडले, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने आयोजित ६ व्या युवा संसद सभेमध्ये ‘आयडिया ऑफ इंडिया’ या सत्रामध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत बोलत होते.

सदाभाऊ खोत म्हणाले की, आज राजकारणामध्ये मूठभर घराणी आहेत. हीच घराणे सत्तेच्या केंद्रभागी कायम राहिली. सत्तेच्या माध्यमातून या घराण्यानी सगळे कारखाने, उद्योग आपल्या ताब्यात ठेवले. साखर कारखाने यांनी आपल्याच ताब्यात ठेवले. आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक केली.

बारामतीच्या एकाच कुटुंबाने लुटीची व्यवस्था निर्माण केली. हा महाराष्ट्र पुरोगामी-पुरोगामी करत स्वत: ची घरं भरली. मी आणि गोपीचंद पडळकर या प्रस्थापितांच्या विरोधात उभे राहिलो. आम्हाला राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडफडणवीस यांनी मदत केली. म्हणूनच आम्हाला देवेंद्र फडणवीस हा माणूस चांगला वाटतो, असे देखील सदाभाऊ खाेत यावेळी म्हणाले.

Tags

follow us