पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक नाही. मात्र, गौतम अडाणीचं कौतुक केले आहे. शरद पवार म्हणजे ओसाड गावचे पाटील आहेत. अशा ओसाड गावच्या पाटलांच्या बोलण्याला अर्थ नसतो, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली.
सदाभाऊ खोत म्हणाले की, आज ही सर्व मंडळी ‘अडाणी’च्या नावाने गळे काढत आहेत. त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की आपण जे पुस्तक लिहिले आहे. त्यात तुम्ही तर या अडाणीचे कौतुक केले आहे. ते कसे. तुमच्या पुस्तकात तुम्ही शेतकऱ्याच कौतुक का केले नाही. मग अडाणीचे कौतुक कसे केले आहे. मग आता अडाणीच्या नावाने गळे का काढत आहे.
शरद पवार यांनी स्वतःचे पुस्तक एकदा वाचावे. त्यांच्या पुस्तकात अडाणी हे खूप गरीब कुटुंबातील आहेत. पण कष्ठाळू आहेत असे का म्हणाले आहेत. मग माझा शेतकरी कष्ट करताना पवार सायंबाना दिसला नाही का, मग माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांवर पवारांनी का नाही लिहिले, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी पवारांना विचारला.