Download App

साई संस्थानचे भक्तांना मास्क वापरण्याचे आवाहन

  • Written By: Last Updated:

राहाता : जगातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील नागरिकांना मास्क वापरण्याचे व कोरोना विषयक नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई संस्थाननेही शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना बीएफ-७ सब व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकारने भारतातील सर्व विमानतळांवर परदेशी प्रवाशांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साईबाबा संस्थानने आपल्या ४० विभागांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत कोरोना प्रतिबंध उपाय योजना तसेच घ्यायची काळजी यावर चर्चा करण्यात आली. साईसंस्थानतर्फे कोविडचे नियम पाळत मास्क परिधान करण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे.

सध्या नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या निमित्ताने शिर्डीत ८ ते ९ लाख भाविक येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. होणारी गर्दी लक्षात घेता साई संस्थान प्रशासनाने सर्व यंत्रणेला सतर्क केले असून भाविकांना सर्व सोयी सुविधा देण्यात येणार असल्याचं सांगितल आहे. गर्दी लक्षात घेता भाविकांनी कोविड रोखण्यासाठी मास्क परिधान करावे, बुस्टर डोस घ्यावा असे आवाहन साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.

Tags

follow us