Download App

सप्टेंबरमध्ये दिल्लीत मोठा स्फोट! संजय राऊतांचा खळबळजनक दावा, दहा वर्षांत न घडलेलं आता घडणार…

Samaana Rokhthok On PM Narendra Modi RSS Conflict : राजकारणात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते, काही घडतंय यापेक्षा काही ‘होणार’ आहे, याची चाहूल अधिक धोकादायक असते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर अशाच काही घडामोडींच्या चर्चांना जोर चढला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रोखठोकमधून (Samaana Rokhthok) एक मोठा दावा केला आहे, दहा वर्षांत जे घडलं नाही, ते या सप्टेंबरमध्ये (PM Modi) घडणार आहे.

उपराष्ट्रपतींचा राजीनामा

धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्त केला. कारण म्हणून प्रकृती अस्वास्थ्य दिलं गेलं, पण त्यांच्या त्या दिवशीच्या वागणुकीत किंवा राज्यसभा कामकाजात त्याचा काहीच लक्षण दिसलं (PM Narendra Modi RSS Conflict) नाही. उलट, सकाळी त्यांनी सभागृहाचे कामकाज नेहमीसारखंच यशस्वीपणे चालवलं होतं. त्यामुळे हा राजीनामा ‘फक्त’ प्रकृतीच्या कारणाने दिला आहे का? हा प्रश्न उभा राहतो. संजय राऊत यांच्या मते, हा निर्णय अचानक नव्हता. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काही ठराविक क्षणात घेतलेले निर्णय, विशेषतः मल्लिकार्जुन खरगे यांचा माईक बंद होणं, नड्डा-रिजिजू यांची अनुपस्थिती आणि त्याच वेळी झालेली पंतप्रधान कार्यालयातील गुप्त बैठक, हे सर्व काही एका मोठ्या भूकंपाचं (BJP) संकेत देणारे भाग आहेत.

Rashi Bhavishya : नोकरी, करिअर, आरोग्य ; आजचा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली

मोदी-संघ संघर्ष उघडकीस?

मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील ‘अदृश्य’ संघर्षाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पण उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर हा संघर्ष आता उघड झाला आहे, असं काही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. मोदींनी स्वतः तयार केलेल्या निवृत्तीच्या वयाच्या 75 वर्षांच्या मर्यादेच्या छायेत आता ते स्वतः येत आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांचा 75वा वाढदिवस आहे. त्यामुळे भाजपमध्येच चर्चा सुरू झाली आहे की, आता मोदींनी पंतप्रधानपद सोडावं. संघालाही आता दिल्लीच्या सत्ताकेंद्रात नवा चेहरा हवा आहे, अशी स्पष्ट चर्चा संघपरिवारात होत असल्याचंही म्हटलं जातं.

ना अ‍ॅक्शन सीन ना धाडसी स्टंट तरी सेटवर रक्त! अभिनेत्रीला भोवला नागरिकांचा बेजबाबदारपणा

वारसदाराच्या शर्यतीत कोण?

मोदी यांच्या नंतर पंतप्रधानपदासाठी संभाव्य चेहरे म्हणून अमित शहा, राजनाथ सिंह, मनोज सिन्हा यांची नावे घेतली जात आहेत. पण एक महत्त्वाचा मुद्दा – मोदी स्वतः अमित शहांना विरोध करतील, असं भाजपमधलाच एक ज्येष्ठ नेता म्हणत असल्याचा दावा रोखठोकमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या पुढच्या राजकीय चालीत अमित शहांना उपराष्ट्रपतीपदावर पाठवून पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून दूर ठेवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

संजय राऊतांनी याच सगळ्या पार्श्वभूमीवर ‘सप्टेंबरमध्ये दिल्लीचं राजकारण ढवळून निघेल’ असं खळबळजनक भाकीत केलं आहे. ते म्हणतात, मोदी जर गेले तर शहांचा किल्लाही कोसळेल. दिल्लीच्या आकाशात नवा सूर्योदय होईल. देशात नव्या परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. दहा वर्षांत जे घडलं नाही, ते आता घडणार आहे. आणि ते घडायलाच हवं!

 

follow us