PM Modi : काहीतरी मोठं घडणार? पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा रद्द

PM Modi : पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार सध्या पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची तयारी करत आहे. सिंधू जल करार (Indus Water Treaty) रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानवर (India vs Pakistan) लष्करी कारवाई करण्याची तयारी सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा रशिया दौरा रद्द झाला आहे. पंतप्रधान मोदी रशियातील विजय दिनाच्या परेडमध्ये सामील होण्यासाठी रशिया दौऱ्यावर जाणार होते मात्र आता त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. जर्मनीवरील विजयाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी 9 मे रोजी मॉस्कोला जाणार होते.
रशियामध्ये दरवर्षी दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियनने नाझी जर्मनीवर मिळवलेल्या विजयाच्या वर्धापन दिनानिमित्त विजय दिन परेड आयोजित करण्यात येते.
एकनिष्ठचे फळ! मुंबई पोलीस आयुक्त पदी देवेन भारती
या परेडमध्ये रशिया आपली ताकद जगाला दाखवते. 2025 च्या परेडसाठी रशियाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शी जिनपिंग यांना आमंत्रित केले आहे.
तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजेच सीसीएसची बैठक बोलावली आहे. याबैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
माहितीनुसार या बैठकीत पाकिस्तान विरोधात कधी आणि कशी लष्करी कारवाई करण्यात येणार याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता.ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सहा पर्यटकांचा समावेश होता.
22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली आहे. यानंतर भारत सरकारकडून पाकिस्तानावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे. तर दुसरीकडे 1960 पासून सुरु असणारा सिंधू जल करार देखील भारताने रद्द केला आहे.