Download App

Sambhajiraje Chatrapati : आमचं टार्गेट २०२४… जनता ठरवणार ‘स्पेस’!

  • Written By: Last Updated:

नाशिक : भाजपमधील (BJP) लोकं मोठी आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. मात्र, सामान्य लोकांच्या अपेक्षा वेगळया आहेत. येणाऱ्या २०२४ मधील निवडणुका या मुख्यत: आमचे टार्गेट आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरु आहे. २०२४ ला आमचे उमेदवार तुम्हाला नक्की दिसतील आणि विजयी होतील. कारण राज्याच्या राजकारणातील ‘स्पेस’ (Political Space) जनता ठरवणार आहे. त्यामुळे मला आता वाटायला लागले आहे. ही ‘स्पेस’ सामान्य माणूस ‘स्वराज्य’ (Swarajya) संघटनेला नक्की देणार आहे, असा विश्वास स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी व्यक्त केला.

संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संभाजीराजे छत्रपती हे पत्रकार परिषदेत बोलत होते. संभाजीराजे म्हणाले की, पक्ष वाढीसाठी मी आजून शहरात प्रयत्न केले नाही. सध्या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. जसा मी ग्रामीण भागात फिरतो तसा मी येणाऱ्या काळात मेट्रो शहरात फिरणार आहे. स्वराज्य संघटने पुढे सगळे पर्याय खुले आहेत.

स्वतःची ताकात उभी करणार आहे. येत्या काळात कोना सोबत जायचे असेल तर तो पर्याय देखील खुला असणार आहे. लोकशाहीत कोणी कुठे जायचे, हे ज्यांनी-त्यांनी ठरवायचे असते. सत्ता केंद्र असल्यावर काम करणं सोपं जाते. राज्यात फिरताना सगळीकडचे कार्यकर्ते म्हणत आहे. तुम्ही आमच्या इथून लोकसभा लढण्यासाठी आग्रह करत आहेत. त्यामुळे किती दिवस आम्ही मोर्चे काढायचे, आंदोलन करायची, सामान्य नागरिकांना ताकद द्यायला हवी. ‘स्वराज्य’ या नावाचा अर्थ आहे की, हे एका जातीचे नाही, १८ पगड जाती बारा-बलुतेदार संघ यांना सोबत घेणार आहे. त्यामुळे आम्ही या लोकांना आमदार-खासदार करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले.

Tags

follow us