Amol Khatal : संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातूनच आपल्या समस्या सुटू शकतात, असा विश्वास व्यक्त करत गावातील असंख्य आदिवासी बंधू-भगिनींनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिरसगाव धुपे येथील आदिवासी बांधवांनी शिवसेना-महायुतीचे आशिष कानवडे आणि भागवत कानवडे यांच्या माध्यमातून आमदार खताळ यांची भेट घेतली.
यावेळी राजू धराडे, निवृत्ती धराडे आणि ग्रामपंचायत सदस्या सुजाता धराडे यांनी गावातील समस्या मांडत त्या मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अंकुश दिघे, रामनाथ भोजने, संतोष धराडे, संतोष दिघे, नामदेव धराडे, सखाराम दिघे, अमित कोरडे, रामा भुतंबरे, दीपक धराडे, गणेश धराडे, संजय धराडे, जालिंदर धराडे, अर्जुन धराडे, सागर धराडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या सुजाता धराडे, पूजा धराडे, सखुबाई धराडे, संगीता दिघे, संगीता कोरडे, चंद्रभागा कोरडे, नेहाबाई धराडे, मंगला कोरडे, हिराबाई दिघे, मंदाबाई कोरडे, सोनाबाई धराडे आणि विजया धराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी आमदार खताळ (Amol Khatal) म्हणाले, या तालुक्यातील तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार होण्याची संधी दिली आहे. ही संधी केवळ आमदार म्हणून मिरविण्यासाठी नसून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मिळाली आहे. त्यामुळे शिरसगाव धुपे येथील पाणी, रस्ते आणि वीज यांसारखे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहेत. नदीकाठची काही गावे वगळता तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर बनली आहे. त्यामध्ये शिरसगाव धुपे गावाचाही समावेश आहे. सातगाव पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून गावाला पाणी मिळत असले, तरी शिरसगाव धुपे हे उंचावर असल्यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी, गावातील पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या समस्येवर मार्ग काढून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या 40 वर्षांत अनेकांनी स्वतःचा स्वार्थ साधताना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. मात्र, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण म्हणून मला जनतेने काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे कोणत्याही ठेकेदाराचे हित जपण्याऐवजी सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करणे, हेच माझे उद्दिष्ट आहे. प्रत्येक गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी जलजीवन योजना सुरू करण्यात आली. मात्र, या योजनेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी ठेकेदारांना पोसण्यासाठी झाल्याची टीकाही आमदार अमोल खताळ यांनी केली.
लाडक्या बहिणींनो, खात्यात जमा होणार 3 हजार रुपये ; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय?
संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील बिरोबा महाराजांच्या यात्रोत्सवासाठी सभामंडपाची आवश्यकता असल्याची मागणी आदिवासी बांधवांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेत आमदार खताळ यांनी, यंदाच्या यात्रेसाठी सभामंडप उभारणे शक्य झाले नाही, तरी पुढील वर्षीची यात्रा निश्चितच सभामंडपात होईल, असा शब्द दिला. तसेच गावातील पाणी आणि रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
