Sangli NEET Exam: सांगलीत (Sangli News) नीट परीक्षेच्या दरम्यान (Neet Exam) एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉपी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यास आलेल्या उमेदवारांना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा देण्यास लावले असल्याची तक्रार उमेदवारांनी पालकांककडे केली आहे. (NEET Exam Controversy) त्यानंतर पालकांनी या संतापजनक प्रकाराची माहिती मिळाल्यावर त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तसेच देशभरामध्ये 7 मे रोजी नीट परीक्षा पार पडत आहे. या परीक्षा पार पडत असताना सांगली शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देखील परीक्षेला बसण्यासाठी अगोदर त्यांचे कपडे आणि अंतरवस्त्र उलटे परिधान करायला लावले असल्याचा आरोप आता काही विद्यार्थ्यांनी केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे-गौरव बापट भेट, भाजपचा पुण्याचा उमेदवार ठरला?
या परीक्षा केंद्रामध्ये येणाऱ्या विद्यार्थिनींचे तपासणी करून त्यांना त्यांचे कपडे उलटे परिधान करायला लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याचा विद्यार्थ्यांना देखील आपली कपडे त्या ठिकाणी असणाऱ्या खोल्यांमध्ये बदलून ते उलटे घालूनच परीक्षा द्यावी लागली आहे. परीक्षा संपल्यावर बाहेर आलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावरील कपडे उलटे पाहून पालकांना याविषयी मोठा प्रश्न पडला होता.
धक्कादायक! पैसे घेऊन नापासांना पास केले; पुण्यात बनावट विद्यापीठाचा भांडाफोड
याची विचारणा केली असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्याबरोबर हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. यानंतर हा धक्कादायक घडलेल्या प्रकारावर पालकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. दरम्यान हा धक्कादायक घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे मत पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे काही पालकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. अशा प्रकारची तपासणी करून विद्यार्थ्यांना विशेषत: मुलींना उलटे कपडे घालायला लावणं हे कितपत योग्य आहे? आणि ते कोणत्या चौकटीत बसतं? आणि कपडे बदलताना मुलींच्या सुरक्षेची कितपत काळजी घेतली गेली? असे अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहे.