Amol Khatal Criticize Balasaheb Thorat : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तनादरम्यान राडा झाला. यावेळी ह.भ.प. संग्राम भंडारे महाराजांवर देखील हल्ला (Sangram Bhandare Maharaj Kirtan Rada) झाल्याचे बोलले जात आहे. याच मुद्द्यावरून आमदार अमोल खताळ यांनी ( MLA Amol Khatal) माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर (Balasaheb Thorat) निशाणा साधला.
व्हॉट्सअपवरती मेसेज…
संगमनेरची संस्कृती 40 वर्षापासून बिघडलेली होती, ती आता कुठेतरी आठ महिन्यांमध्ये तिची घडी बसली आहे. तुम्ही बघा व्हॉट्सअपवरती मेसेज पडलेले आहेत,संध्याकाळी सर्व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं, त्यांना कर्मचाऱ्यांची गरज का पडली? असा सवाल आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित केलाय.
ब्रिटीशांना मदत करणाऱ्यांना जमीन देणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या; शिरसाट रोहित पवारांच्या रडारवर
संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न
तुमचे स्वीय सहाय्यक का तिथे जाऊन बसले होते? संगमनेर हे शांत आहे. मात्र, ते पराभवामुळे व्यथित झालेले आहे. तसेच मागील आठ महिन्यांपासून गुप्तचर विभागामार्फत गुपनीय माहिती मला देखील मिळते. संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न अन् त्यातूनच स्वतःची राजकीय पुनर्जीवन करण्यासाठी सुरू असलेली ही धडपड आहे, असा थेट आरोप करत आमदार अमोल खताळ यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावरती निशाणा साधला.
याद राखा, कायद्याचे राज्य…
खोट्या केसेस दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप थोरात यांनी व्यक्त केला. यावरती बोलताना खताळ म्हणाले की, कोणती खोटी केस दाखल झाली जर त्यांना असं वाटत असेल की, भंडारे महाराजांना कीर्तन करताना अफजल खानावरती बोलत असतील, जर तर तुमचे बगलबच्चे महाराजांवरती धावून जाणार असतील, महाराजांना शिवीगाळ करून त्यांच्या वाहनाची नुकसान करणारं असतील, तर याद राखा, कायद्याचे राज्य आहे.
समाजकंटकांवरती कारवाया होणार
तुमच्या कार्यकाळामध्ये पोलिसांवरती हल्ले झाले होते. आमच्या कार्यकाळामध्ये नाकारते अन् समाजकंटकांवरती कारवाया होणार. उद्या तुम्ही देखील तसा प्रयत्न करून पहा. तुमच्यावर देखील तशी कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी आम्ही आग्रही राहू, असा इशारा देत आमदार अमोल खताळ यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांवर निशाणा साधला.