Download App

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का! संग्राम थोपटे पक्षाची साथ सोडणार?

Sangram Thopte : विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते असलेले भोर-मुळशी-वेल्हा

  • Written By: Last Updated:

प्रतिनिधी : विष्णू सानप

Sangram Thopte : विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते असलेले भोर-मुळशी-वेल्हा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) काँग्रेसचा हात सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती, मात्र बैठकीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  सूत्राच्या माहितीनुसार लवकरच थोपटे हे काँग्रेसचा (Congress) हात सोडणार आहे. त्यामुळे जर संग्राम थोपटेंनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेसला पुण्यात दुसरा मोठा धक्का असणार आहे.

काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी काँग्रेसची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. पुणे जिल्ह्यातील भोर-मुळशी वेल्हा हा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिलेला आहे. हा मतदारसंघ गेल्या 40 वर्षांपासून थोपटे कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. कुठल्याही मतदार संघात काही होईल मात्र या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार जिंकणार, असा विश्वास काँग्रेस पक्षश्रेष्ठींना होता. मात्र 2024 विधानसभा निवडणुकीत जायंट किलर शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर संग्राम थोपटेंना चितपट केलं आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. या निवडणुकीत थोपटेंचा सुमारे 20 हजार मतांनी पराभव झाला होता.

काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला

सुमारे 40 वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व थोपटे कुटुंबीयांनी केला आहे. संग्राम थोपटे यांच्या आधी त्यांचे वडील आनंदराव थोपटे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलं होतं. भोर-मुळशी- वेल्हा मतदारसंघ आणि थोपटे कुटुंबीय हे एक समीकरणच बनलं होतं. मात्र या विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार असताना थोपटे यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती मात्र तसं होऊ शकलं नाही त्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदीतरी वर्णी लागेल यासाठी थोपटे प्रयत्न केले होते असं बोललं जातं मात्र ती ही संधी हुकली त्यानंतर पुढे विधानसभेला सामोरे जात असताना थोपटे काँग्रेसवर नाराज आहेत ते निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये जातील अशाही चर्चा रंगल्या होत्या मात्र तसं काहीच झालं नाही आणि थोपटे काँग्रेसमध्येच राहिले आणि निवडणूक लढले मात्र त्यांना यावेळी अपयश आलं. आता थोपटे आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोपटेंच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रात आणि एकूणच महाराष्ट्र काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तर आता  काँग्रेसला पुणे जिल्ह्यात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पीबीजी पुणे जॅग्वार्सला मिळाली मोठी ताकद, इजिप्तच्या दिना मेशरेफचा संघात समावेश

तर दुसरीकडे आता थोपटे यांना थांबवण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठ फिल्डिंग लावतात की थोपटे आपला निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, त्यांच्याशी याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

follow us