Download App

Maharashtra Politics : ‘३२ वर्षे हे लग्नासाठीचं…; संजय गायकवाड यांनी दिला आदित्य ठाकरे ‘हा’ सल्ला

  • Written By: Last Updated:

बुलढाणा : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना चॅलेंज दिलं आहे. मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडून येऊन दाखवा. तुम्ही कितीही खोके वाटले, तरी इथला एकही शिवसैनिक विकला जाणार नाही, असा चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी दिलं. आदित्य ठाकरे यांच्या चॅलेंजनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजवर (challenge) प्रत्युत्तर देत असताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सल्ला दिला. आदित्य ठाकरेंचं वय ३२ वर्षे झालं आहे, त्यांचं लग्नाचं वय उलटून गेलं आहे. त्यांनी चांगली पोरगी बघून लग्न करावं. चांगला संसार करावा, विनाकारण आपल्या औकातीपेक्षा जास्त बोलू नये, अशी जोरदार टीका संजय गायकवाडांनी (Sanjay Gaikwad) केली.

यावेळी संजय गायकवाड म्हणाले, ‘आदित्य ठाकरेंनी आपली कुवत पाहून… ताकद पाहून… आपण कुणाला आव्हान देत आहोत ? हे पाहावं. राज्यातील प्रश्न सोडवण्याचं, शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याचं, राज्याला सिंचन प्रकल्प देण्याचं, राज्यात उद्योगधंदे आणून बेरोजगारांना रोजगार द्यायचं, अशी आव्हानं एकनाथ शिंदेंनी स्वीकारली. ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. ते अशा कुठल्याही टीकेला कामातून उत्तर देतात. आणि आम्ही तुमच्या या टीकेला आम्ही भिकेचे टोपली दाखवतो.

संजय गायकवाड पुढे म्हणाले, “संजय राऊत म्हणत असतील की, ३२ वर्षाच्या पोरानं चॅलेंज दिलंय. तर मला वाटतं की, ३२ वर्षे हे लग्नासाठीचं उलटून गेलेलं वय आहे. त्यामुळे त्यांना सल्ला आहे की, त्यांनी चांगली पोरगी बघून लग्न करावं. चांगला संसार करावा. विनाकारण आपल्या औकातीपेक्षा जास्त बोलू नये. असे ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांच्या मतदारसंघात पराभव करणारा अजून जन्माला यायचा आहे, असा पलटवार आमदार संजय गायकवाड यांनी केला.

Tags

follow us