Download App

Eknath Shinde रूपाने आमचा हिरा लखलख करतोय; संजय गायकवाडांच ठाकरेंना उत्तर

  • Written By: Last Updated:

बुलढाणा : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. ‘बरं झाले गद्दार गेले, त्यामुळे हिरे सापडले, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

हिऱ्यांची किंमत किंवा हिऱ्यांची पारख बाजारात गेल्यावरच कळते. मुख्यमंत्र्यांच्या रूपाने आज आमचा हिरा लखलख करतोय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कपाळावर बाळासाहेबांचा हिऱ्याचा मुकुट शोभतो का? असा टोला आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांना लागवला. ते बुलडाण्यात बोलत होते.

बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली ती भाजपची पालखी वाहण्यासाठी नाही. हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी केली आहे, अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली होती.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला शिंदे गटातील बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. ‘हिऱ्यांची किंमत किंवा हिऱ्यांची पारख बाजारात गेल्यावरच कळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने आज आमचा हिरा लखलख करतोय, मंत्री सुद्धा लख लख करताहेत, असं गायकवाड म्हणाले.

पुढे बोलताना, संजय गायकवाड म्हणाले, हिऱ्याची किंमत आज राज्याला कळली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कपाळावर बाळासाहेबांचा हिऱ्याचा मुकुट शोभतो का? हा प्रश्न सगळ्यांनी केला पाहिजे. उगाच त्यात आमचा हिरा चिपकवून त्यांची किंमत कमी करणे, हा उद्देश असू शकतो. असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us