कोणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही ; शिवसेना-धनुष्यबाण शिंदेंचाच; संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? 

Sanjay Gaikwad : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून ठाकरे गटाकडून

Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत सर्वोच्च न्यायालयासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पुढील सुनावणीत शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जनतेनेच आमच्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचाच आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, जनतेच्या न्यायालयात आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण आणि शिवसेना हे चार अक्षरी पक्षाचे नाव घेऊन लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद आणि पोटनिवडणुका लढलो. या सर्व निवडणुकांमध्ये जनतेने आम्हाला राज्यातील नंबर दोनचा पक्ष म्हणून मान्यता दिली. केंद्रातही महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार असल्यामुळे आम्हाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आम्हाला कोणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही. जनतेनेच आमच्यावर शिक्कामोर्तब केले आहे त्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचाच आहे असं माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले.

तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना यावेळी त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. संजय गायकवाड म्हणाले की, ज्या 60 आमदारांना लाखो लोकांनी मतदान केलं, त्यांनी शेण खाल्लं असं संजय राऊत यांनी म्हणायचं का? किंवा ज्या नगरपालिकांमध्ये कोट्यवधी लोकांनी आमच्या उमेदवारांना मतदान केलं, तिथे जवळपास 40 नगराध्यक्ष आणि 300 नगरसेवक आमचे निवडून आले आहेत. त्यांनीही शेण खाल्लं असं म्हणायचं का? संजय राऊत यांच्यासारख्या शेण खाणाऱ्या माणसाला कोणावर काय टीका करावी, याची अक्कल नसल्यामुळे ते अशी वक्तव्यं करतात. जनतेने शिक्कामोर्तब करून आम्हाला मान्यता दिली आहे.

लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमाला राहुल गांधी अनुपस्थित, कारण काय? पवन खेडा स्पष्टच बोलले …

तर आज कोणत्याही शिवसेनेच्या कार्यकर्त्याने भोळं राहून फायदा नाही. जो भोळा राहील, त्याला मित्रपक्ष गडप करतील असं देखील आमदार संजय गायकवाड म्हणाले.

Exit mobile version