Download App

Sanjay Kakde : पाच हजारांचे लीड द्या… अन्यथा तुमचं नगरसेवकाचं तिकिट कापणार

पुणे : प्रत्येक मतदार संघात जर तुम्ही महानगरपालिकेत पाच हजार मतांनी निवडून येत आहात आणि या पोटनिवडणुकीत जर तुम्ही पाच हजारांचे लीड दिले नाही. तर तेथे तुमचे लक्ष नाही असा अर्थ होतो. जर प्रभागात कमी मतदान पडेल त्या ठिकाणच्या नगरसेवकाचं तिकीट धोक्यात येईल, अशी धमकीवजा इशारा माजी खासदार संजय काकडे यांनी भाजपच्या नगरसेवकांना दिला.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपची नुकतीच एक बैठक पार पडली. त्यात भाजप नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी नगरसेवकांना चांगलंच झापलं आहे. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या घरीच तिकीट देण्यात येईल. मग लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला तिकीट द्यायचे की भावाला हा त्यांचा अंतर्गत विषय आहे पण उमेदवारी ही जगतापांच्या घरातच देण्यात येईल, असे काकडे यांनी स्पष्ट केले.

संजय काकडे म्हणाले की, भाजपच्या प्रत्येक नगरसेवकांनी काम केलेच पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. प्रभागात कमी मतदान पडेल त्या ठिकाणच्या नगरसेवकाचे तिकीट धोक्यात येईल, याची खबरदारी घ्या. महापालिकेची पूर्वतयारी निवडणूक म्हणून याकडे पहा आणि लढा. कसबा मतदारसंघातून तीन नावे प्रदेश समितीकडे जाणार आहेत. त्यातील जे नाव अंतिम होईल त्याच काम प्रत्येकाला करावेच लागणार आहे.

Tags

follow us