Sanjay Raut On Eknath Shinde : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टप्या-टप्प्यांने गेम करतील आणि शेवटचा घाव मिंध्यावर असेल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीमधील दोन्ही घटक पक्षांना दिला आहे. मुंबई येथे पत्रकार परिषद घेत खासदार संजय राऊत यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच भविष्यात शिंदेंचा पक्ष अस्तित्वात असेल का ? अशी शंकाही त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपस्थित केली.
राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याने त्यांना मंत्रिमंडळाता पुन्हा एकदा स्थान मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी भाष्य करत अजूनही वाल्मिक कराड तुरुंगात आहे. अजूनही खटला संपलेला नाही. अशावेळी ज्यांच्यावरती गंभीर स्वरुपाचे आरोप होते, त्यांनी पुन्हा मंत्रिमंडळात परत घेण्याचं पाप मुख्यमंत्री फडणवीस करतील असे मला वाटत नाही असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
फडणवीस (Devendra Fadnavis) मंत्रिमंडळातील एकाच (Eknath Shinde) गटाचे दोन मंत्री, भष्टाचार आणि गुंडागर्दी मुळे गेले ही या सरकारला लागलेली कळीमा आहे असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंसह मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आज शिंदे गटाचे असंख्य मंत्री आहे ज्यांना तात्काळ बरखास्त करायला हवे. पैशांच्या बॅगा दिसत आहेत. इतरही अनेक विषय आहे पण फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील आणि शेवटचा घाव ते मिंध्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे असं देखील खासदार संजय राऊत म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरु
तर पुढे बोलताना या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरु आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सरकारवर हल्लाबोल केला. खासदार संजय राऊत म्हणाले की, कोकाटे यांना वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न सुरु आहे मात्र आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या मागे उभे राहतो हा संदेश या प्रकरणातून सरकार देत आहे असेही खासदार राऊत म्हणाले. काही करा आणि आमच्याकडे या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा मेसेज महाराष्ट्रात फडणवीस देत आहेत असा आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज्य सरकारच्या निर्णयाने गुटखा उत्पादकांना चपराक; आता मकोका अंतर्गत होणार कारवाई
अजित पवार हे भाजपचे हस्तक
तर मुंबई महापालिकेत महापौर हा ठाकरे बंधूंचाच होणार असा दावा करत संजय राऊत यांनी अजित पवार हे भाजपचे हस्तक असल्याचा आरोप त्यांनी केला.
