पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला; राऊतांनी सरकारला सुनावले

Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहे. इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याचे राऊतांनी म्हटले. पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला, अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावले. आळंदी येथे काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी पोलिस व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे आढळून आले. याघटनेनंतर […]

Letsupp Image   2023 06 12T104953.392

Letsupp Image 2023 06 12T104953.392

Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहे. इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याचे राऊतांनी म्हटले. पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला, अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावले.

आळंदी येथे काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी पोलिस व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे आढळून आले. याघटनेनंतर सर्वस्तरातून प्रतिक्रिया येत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे.

PM Modi US Visit : अमेरिकन व्यावसायिकांमध्येही पंतप्रधान मोदींची क्रेज; दौऱ्याआधीच सुरु केली ‘मोदी थाळी’

वारकऱ्यांवरचा हल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला आहे. पंढरीची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता आहे. संपूर्ण जगाभरामध्ये वारीचा सन्मान केला जातो. त्यांचं नियोजन, संयम, शांतता, शिस्त अशी वारी असते आणि त्या वारीवर सरकारच्या माध्यमातून असे संकट कधी आले नव्हते. हे सरकारमधील लोकं विठोबाची महापूजा करायला बसतील. त्यांना हा अधिकार नाही. त्यांनी आधी वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे.

लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? रोहित पवारांचा सरकारला सवाल

हे लक्षण कोणते आहे. ही सत्तेची मस्ती आहे. ठिकठिकाणी भाजप आपली सत्तेची मस्ती दाखवायला लागलेला आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर, नगर याठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम हे करत असल्याचा आरोप राऊतांनी केला.

काल इतिहासातला निघृण प्रकार महाराष्ट्रात झाला. आळंदीमध्ये वारकरी बांधवांवर हल्ला झाला. तुमचे ते धर्माभिमानी एकनाथ शिंदे कुठे आहे?. हिंदुत्वाचा आक्रोश करणारे देवेंद्र फडणवीस हे कुठे आहे?. वारकऱ्यांवरचा हल्ला हा हिंदुत्वावरील हल्ला नाही आहे का? आता हिंदुआक्रोश मोर्चा काढा, अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावले आहे.

Exit mobile version