ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. संजय राऊत यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी सरकारविरोधात आवाहन केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारविरोधात आवाहन केलं होतं. “हे सरकार बेकायदेशीर असून सरकारचे आदेश पाळू नये” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं होतं.
9 Years Of Modi Government : दहा दिवसात PM मोदी देशाला देणार मोठं गिफ्ट?
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतच असं आवाहन केलं होतं. त्यानंतर पोलिस कर्मचारी केदारे यांच्या फिर्यादीवरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात राज्यपालांचे निर्णय बेकायदेशीर ठरल्याचं संजय राऊतांनी सांगितलं होतं. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची निवडही बेकायदेशीर असल्याचं ते म्हणाले होते.
दंगली घडवून सत्तेत येण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न; नितेश राणेंच मोठं वक्तव्य
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील शिंदे-भाजप सरकार बेकायदेशीर ठरविल्याने सरकारचे बेकायदा आदेश विधानसभा अध्यक्ष, प्रशासन आणि पोलिसांनी पाळू नये. अन्यथा तुम्हीच अडचणीत येणार असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिला होता.
त्यानंतर राऊत यांच्या विरोधात पोलीस अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या अन्य कलमांद्वारे मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी संजय राऊत यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.